वाढदिवसानिमित्त कोरोना विषयक जनजागृती आणि बचाव साहित्य वाटप
वाढदिवसानिमित्त कोरोना विषयक जनजागृती आणि बचाव साहित्य वाटप

विजय विकास यांचा अनोखा उपक्रम

 

उरण 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषयक जनजागृती करत कोरोना  रोगापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या वाफारा मशीनचे किट नागरिकांना, ग्रामस्थांना वाटप करून उरण तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी नामवंत व प्रसिद्ध असे विजय विकास सामाजिक संस्थेचे संस्थापक विजय भोईर, विकास भोईर यांनी आपला वाढदिवस साजरा केला.  नेहमीच  सामाजिक बांधिलकीतून गावात अनेक सामाजिक उपक्रम राबवणा-या विजय विकास सामाजिक संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांनी, ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

 

राजकारणातील उत्तम राजकीय पदाधिकारी कार्यकर्ता, ऍक्टिव्ह जिल्हा परिषद मेंबर  म्हणून  विजय भोईर यांची रायगड जिल्ह्यात ओळख आहे तर त्यांचे बंधू विकास भोईर हे  उद्योग व्यवसायात कार्यरत असलेले उत्तम व्यक्तिमत्व असून उद्योग धंद्यांतही त्यांनी चांगली प्रगती केली आहे.सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ह्या दोन्ही जुळ्या भावांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्हाट्सअँप, फेसबुक आदी सोशल मीडियाद्वारेही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

मु.नवघर ता.उरण जिल्हा रायगड येथील विजय विकास सामाजिक संस्थे तर्फे नवघर ग्रामपंचायतीमध्ये कोरोना काळ लक्षात घेऊन दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय राजाराम भोईर व त्यांचे बंधू प्रसिद्ध उद्योजक विकास राजाराम भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विजय विकास सामाजिक संस्थे तर्फे नवघर ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांना घरोघरी जाऊन एकूण 700 वाफारा मशीन किट वाटण्यात आले. सर्व ग्रामस्थांनी घरी रहा, सुरक्षित रहा आणि शासनाचे नियम पाळा, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन  एकाच दिवशी जन्मलेल्या दोघ्या जुळ्या भावांनी आपल्या वाढदिवसानिमित्त यावेळी  केले.

 

 


 

 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या