Top Post Ad

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेची उत्तम अंमलबजावणी करण्याचे निर्देश

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी घेतला आढावा
ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात मोहीम यशस्वी करण्यासाठी उत्तम अंमलबजावणी करण्याचे निर्देश


ठाणे
ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम  सुरु असून ही मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी उत्तम अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी दिले. त्यांनी २२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे  खातेप्रमुख, मोहिमेचे संपर्क अधिकारी,  तालुक्याचे गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली.  कोव्हिडवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्याच्या मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर तालुक्यात  मोहीम राबविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील लोकप्रतिनिधीच्या हस्ते मोहिमेचे उदघाटन करण्यात आले होते. 


या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. या मोहिमेचे संशयित कोव्हिडं तपासणी, व  उपचार, अति जोखमीचें व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोव्हिडं १९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, रुग्णांचे गृहभेटीद्वारे संरक्षण, कोव्हिडं तपासणी आणि उपचार, आरोग्य शिक्षण, आदी प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मोहीम राबविण्यात येत आहे. या  मोहिमेत आरोग्य विभागा मार्फत घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या पथकात आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, स्थानिक स्वयंसेवक यांचा समावेश आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे.नागरिकांना स्वयंस्फुर्तीने या मोहिमेत सहभागी करून घेण्याची सूचना  सातपुते यांनी केली. याशिवाय मोहिमेची प्रचार प्रसिद्धी गावात व्हावी यासाठी  ग्रामपंचायतीच्या भिंतीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी आशयाचे संदेश लिहिण्याची सूचनाही त्यांनी केली.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1