Top Post Ad

सेवाजेष्ठता  व पदोन्नोतीबाबत डी. एड. पदवीधर शिक्षकांचे लाक्षणिक उपोषण
शिक्षक दिनी डी. एड. पदवीधर शिक्षकांनी केले लाक्षणिक उपोषण

 

शहापूर
महाराष्ट्रातील शिक्षणााधिकाऱ्यांमध्ये सेवाजेष्ठता  व पदोन्नोती बाबत एक वाक्यता असावी .यासाठी संपुर्ण राज्यातील महाराष्ट्र माध्यमिक डी एड शिक्षक महासंघाच्या शिक्षकांनी लाक्षणिक उपोषण केले. शिक्षकांच्या सन्मानाच्या दिवशी शिक्षकांचे उपोषण म्हणजे न पचणारे उपोषण परंतु त्यांच्या न्याय हक्कासाठी शिक्षक दिनी डी एड पदवीधर शिक्षकांनी शनिवारी ५ सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्यसह संपुर्ण महाराष्ट्रात घरात राहून लाक्षणिक उपोषण केले. अशी माहिती राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक व महाराष्ट्र माध्यमिक डी एड शिक्षक महासंघाचे मुबंई व कोकण विभाग सचिव काळूराम धनगर यांनी दिली.  

 

महाराष्ट्रात खाजगी माध्यमिक शिक्षकांचे व्यवस्थापन आधिनियम १९७७ व नियमावली १९८१ प्रमाणे चालते. माध्यमिक शिक्षकांची सेवाजेष्ठता नियम १२ अनुसुची फ परिच्छेद २  प्रवर्ग क  मधील ४ मुद्दे व टिप १ ते१० प्रमाणे ठरवावी असे दिले आहे त्या नुसारच डी एड शिक्षक पदवी नतंर प्रवर्ग क मध्ये जातो.तशा प्रकारचे परिपत्रक राज्याचे राज्य शिक्षणमंत्री माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या निर्देशानुसार व  अवर सचिव  यांच्या परिपत्रक दि ३/५/२०१९ व पत्र दि १९/१०/२०१९ च्या अनुषांगाने अमरावती विभागाचे उपसंचालक ए एस पेदोंर यांनी त्याच्या पाच जिल्हयासाठी  काढले आहे .तसेच स्पष्ट परिपत्रक अवर सचिवांनी किंवा उर्वरहित उपसंचालकानी काढुन संपूर्ण महाराष्ट्रात अमंलबजावणी करावी व डी एड पदवीधर शिक्षकांना न्याय दयावा .टिप २,५ व ८ चा वापर करून समाईक सेवाजेष्ठता करावी. अशा मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आले.


 

 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com