प्रादेशिक परिवहन कार्यालयात R C  Book घोटाळा

प्रादेशिक परिवहन कार्यालयात भ्रष्टाचाराची अनोखी पद्धत            


 ठाणे  


भ्रष्टाचाराची एक अनोखी पद्धत परिवहन कार्यालयात सध्या सूरु असून अनेकजण या भ्रष्टाचाराचे बळी पडले आहेत. वाहन चालकांनी वाहन विकत घेतल्यानंतर परिवहन कार्यालयातून नोंदणी प्रमाणपत्र  (R C  Book) संबंधित व्यक्तीच्या राहत्या घरच्या पत्त्यावर पाठवले जाते परंतु परिवहन कार्यालयातील कारकून मंडळी विभाग वार पोस्टमनसोबत संगनमत करून पाठवलेले पोस्ट सम्बथीत व्यक्तींना न कळवताच परस्पर परत प्रा. कार्यालतात मागवून घेतात, नोंदणी प्रमाण पत्र (RC Book)लवकर पाहिजे असेल तर पोस्टमनला काही द्यावे लागेल नाही तर अजून एक ते दीड महिना लागू शकतो. अशी भीती घालून संबंधित व्यक्तींकडून दोन ते तीन हजार रुपये उकळले जातात. 


 संबंधित व्यक्तीचे पोस्ट परत प्रादेशिक कार्यालयात आले म्हणून त्याने चौकशी केली तर  कार्यालयातून उडवा उडवीची उत्तरे देऊन हतबल केले जाते. त्याला जाणिवपूर्वक अनेक वेळा कार्यालयात फेऱ्या मारण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यानंतर त्याला कार्यालयाशी सम्बन्ध नसलेले पावती पुस्तकं पुढे करून (नाशिक सातपूर येथील संस्थेचे ) पावती जबरदस्तीने  घेण्यासाठी भाग पाडतात,  याचा अनुभव संजय पासवान या वाहन चालकाला आल्याने हा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. त्याने  6 महिन्या पूर्वी बँक कर्ज घेऊन प्रवासी वाहन विकत घेतले होते.. मात्र परिवहन कार्यालयातुन नोंदणी प्रमाणपत्र (R C  Book) संबंधितांच्या राहत्या घरच्या पत्त्यावर न आल्याने त्याने चौकशी केली असता  तूला तूझे नोंदणी प्रमाण पत्र (RC Book)लवकर पाहिजे असेल तर पोस्टमनला रुपये 1500/-द्यावे लागतील नाही तर अजून 1ते दीड महिना लागू शकतो. असे सांगण्यात आले. 


 या बाबत प्रा. परिवहन अधिकारी रमेश जमखंडीकर यांच्याशी सपंर्क साधला असता ते देखील कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या