रस्त्यांवरील खड्डे म्हणजे भ्रष्टाचाराचे प्रतिक, सर्व रस्त्याचे ऑडिट करण्याची मागणी  

सी आय टी यू, अखिल भारतीय किसान सभा, जनवादी महिला संघटना व डी वाय एफ आय कडून
तहसीलदारांना उरण मधील विविध समस्या संदर्भात निवेदन. 
संबंधित अधिकाऱ्यांशी झाली चर्चा, वेळेवर काम पूर्ण करण्याचे तहसीलदार यांचे आदेश. 


उरण
 सी.आय.टी.यू., अखिल भारतीय किसान सभा, जनवादी महिला संघटना व डी.वाय.एफ.आय. च्या शिष्टमंडळाची जनतेच्या विवीध मागण्यांबाबत उरणचे मा.तहसिलदार भाऊसाहेब अंधारे  यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.या बैठकीत सिडकोचे, उरण नगर परिषद चे,पंचायत समिती चे, वीजवितरण कंपनी चे अधिकारी तसेच एस् टी चे अगार प्रमुख व वाहतुक नियंत्रक उपस्थित होते.यावेळी संबंधित त्या त्या अधिकाऱ्यांना प्रलंबित समस्या विषयी प्रश्न विचारण्यात आले.विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळ्यात जवळजवळ सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. या रस्त्यांवरील खड्डे म्हणजे भ्रष्टाचाराचे प्रतिक आहे. म्हणूनच या सर्व रस्त्याचे ऑडिट झाले पाहिजे अशी मागणीही करण्यात आली.वीज वितरण कंपनी गव्हाणफाटा येथे नवीन सबस्टेशन उभारणार आहे. तर द्रोणागिरी सेक्टर १२ येथील सबस्टेशन लवकरच सुरू करुन वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.


सिडकोने द्रोणागिरी नोड मधील सर्व रस्त्यांची दुरुस्तीची कामे सुरू करत आहोत,तसेच चारफाटा उरण येथील नाल्याचे व रस्ता निर्मिती कामात चाणजे ग्रामपंचायतने सहकार्य करावे याठिकाणी ओएनजीसी,वीज वितरण कंपनीने देखिल अडथळे दुर करण्यासाठी सहकार्य केले तर मर्यादित वेळेत तेथे सुसज्ज रस्ता निर्माण होईल. मच्छी मार्केट साठी स्वतंत्र जागा देणार आहे.स्त्याच्या कडेला व दुभाजकावर असणारे गवत व   वाहतुकीस अडथळा असणारी झाडे झुडपे ठेकेदारामार्फत काढली जातील. करंजा नवीन जेटी कडून येणारा रस्ता व खोपटे पुलाखाली अपघात होऊ नये या दृष्टीने आवश्यक काम केले जाईल. नवघर फाटा ते भेंडखळ रस्त्याचे काम प्रस्तावित आहे.जिल्हा परिषद, पंचायत समिती अंतर्गत येणारा करंजा कासवाला रस्त्याच्या,एकटघर ते धुतूम रस्त्याच्या नुतनीकरण करण्याची मागणी यावेळी केली.उरण नगरपरिषद अंतर्गत सुरु असलेली रस्त्याची कामे लवकरच पूर्ण होतील ,त्यांनी मान्यता दिल्यास एन ए डी तसेच करंजा ची एस टी बस तसेच मिनी बस सुरू करता येईल.गेली अनेक वर्षे रस्ते विकासाच्या नाव खाली शासनाने करोडो रुपये खर्च केले आहेत. लवकरच एस् टी.च्या खारपाडा बस नव्याने सुरू होतील. करंजा व  एन.ए.डी. करीता छोट्या बसची मागणी करुन ती या मार्गावर चालवण्याची तयारी केली जाईल.असे बस महामंडळ कडून सांगण्यात आले. 


   रेशनिंग व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी मा.तहसिलदार भाऊसाहेब अंधारे प्रयत्नशील रहाणार आहेत, निःसंकोचपणे दुकानदाराने दिलेले धान्य व रेशन कार्ड वर लिहिले माहिती अयोग्य दिसल्यास तक्रार करावी. दर महिन्याला धान्याची माहिती दुकानदाराने फलकावर लिहीली पाहीजे.  तक्रार आल्यास संबंधित स्वस्त धान्य दुकानाची तपासणी केली जाईल .सर्व ग्राहकांना सुरळीत धान्यपुरवठा होईल याची काळजी घेतली जाईल.अशी चर्चा झाली.  तसेच करंजा येथील पाणी पुरवठा नियमित होण्या साठी तहसीलदार प्रयत्नशील राहतील असे सांगितले.सार्वजनिक बांधकाम विभाग व NHAI  चे अधिकारी अनुपस्थित होते याचा खुलासा तहसीलदार घेणार आहेत.दोन तास चाललेल्या या बैठकीत सी आय टी यू चे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड भूषण पाटील, किसान सभेचे सेक्रेटरी कॉम्रेड संजय ठाकूर,डि वाय एफ आय चे राज्य कोषाध्यक्ष संतोष ठाकूर, जिल्हा अध्यक्ष दिनेश म्हात्रे, ऍड विपुल ठाकूर जनवादी महिला संघटनेच्या निराताई घरत,रजनी पाटील,गिता पाटील,सुनंदा वाघमारे, अपर्णा म्हात्रे, रसिक घरत, छाया मढवी,  रुपाली पाटील सहभागी झाल्या होत्या. या  बैठकीत सकारात्मक चर्चा घडवून आणल्या बद्दल  मा.तहसिलदार उरण यांचे आभार व्यक्त करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA