Top Post Ad

चीनकडची मजबूत मागणी कामोडिटीजच्या भावनांना आधार देण्यात अपयशी

चीनकडची मजबूत मागणी कामोडिटीजच्या भावनांना आधार देण्यात अपयशी

अमेरिकी अर्थतंत्राच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या आकडेवारीमुळे गुंतवणूकदारांच्या आशा वाढल्या, सोन्याच्या किंमतीवरील दबाव वाढला. अमेरिकी डॉलरच्या किंमतीतील सुधारणेमुळे इतर कामोडिटीजमध्ये देखील हा दबाव जाणवला.
तांबे: गुरुवारी एलएमईवर तांब्याचे भाव २ टक्क्यांनी कमी होऊन ६५६३.५ डॉलर प्रति किलोवर बंद झाले. इन्व्हेंटरी कमी होण्याच्या तुलनेत पुरवठ्याची काळजी मिटल्याचा प्रभाव जास्त होता व त्यामुळे किंमती उतरल्या.


सोने: गुरुवारी, सोन्याच्या स्पॉट किंमती ०.६२ टक्क्यांनी घसरून १९३०.५ डॉलर प्रती औंस वर बंद झाल्या, कारण अमेरिकेच्या मजबूत आर्थिक डेटामुळे इकॉनॉमिक रिकव्हरी वेगाने होण्याच्या आशा निर्माण झाल्या आणि सोन्याविषयीची ओढ कमी झाली. अमेरिकी फॅक्टरींच्या कामांत झालेली वाढ व बेरोजगारीचे कमी झालेले आकडे यामुळे महामारीच्या घसरणीनंतर जलद रिकव्हरी होण्याची आशा निर्माण झाली. इंस्टीट्यूट ऑफ सप्लाय मॅनेजमेंटकडील अहवालांनुसार, अमेरिकी फॅक्टरीचे आकडे ऑगस्ट’२० मध्ये ५६ होते, जे जुलै’२० मध्ये ५४.२ होते. अमेरिकी फॅक्टरी गतिविधींनी सलग तिसर्‍या महिन्यात वाढ नोंदवली, कारण अमेरिकेसाठीच्या ऑर्डर्समुळे माल वाढला. सोन्यातील नुकसान मर्यादित राहिले, कारण अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या अधिकार्‍यांनी, अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी येत्या काही महिन्यांत आणखी स्टिम्युलस उपाय करण्याकडे संकेत केला.


कच्चे तेल: गुरुवारी, डब्ल्यूटीआय क्रूड किंमती ०.३४  टक्क्यांनी कोसळून ४१.४ डॉलर प्रती बॅरलवर बंद झाल्या. मागणीच्या क्षीण शक्यतांमुळे तेलाच्या किंमतीवर दबाव आला. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या डेटा अनुसार, गेल्या आठवड्यात अमेरिकी गॅसोलीन आणि इतर तेलांची मागणी खाली आली. महामारीच्या वाढत्या प्रसारामुळे क्रूडची शक्यता धूसर झाली आणि जगातील ऑइल मार्केट रिकव्हरीसाठी संघर्षरत झाले. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या क्रूड इन्व्हेंटरी स्तरात लक्षणीय घट होऊन देखील, तेलाच्या किंमतीत घसरण झाली. अमेरिकी क्रूड इन्व्हेंटरी ९.४  मिलियन बॅरल्स प्रति दिन पेक्षा जास्त खाली आली. ऑगस्ट’२० मध्ये अमेरिका आणि चीनमधील वाढत्या उत्पादन गतीविधी आणि येत्या महिन्यांमध्ये इराकद्वारा उत्पादनातील अतिरिक्त कपातीच्या अनुमानाने क्रूड तेलाचे नुकसान मर्यादित राहिले.


बेस मेटल्स: गुरुवारी, एलएमईवरील बहुतांशी बेस मेटल किंमती खाली उतरून बंद झाल्या, अमेरिकी डॉलरमधील सुधारणा आणि कमजोर यूएस लेबर मार्केटमुळे या किंमती घसरल्या. परंतु, हे नुकसान मर्यादित होते, कारण फेब्रुवारी’२० मध्ये नोंदलेल्या लक्षणीय घसरणीनंतर फॅक्टरी गतीविधीत स्थिर गतीने वाढ दिसून आली. एका खाजगी सर्वेक्षणानुसार, गेल्या महिन्यात चीनमधील उत्पादन क्षेत्र गेल्या महिन्यात दशकातील सर्वाधिक वेगाने वाढले आहे. व्यापक इन्फ्रास्ट्रक्चर विकास ध्यानात घेऊन झालेल्या स्टील उतपदांनातील वाढीचा, ज्याचा अर्थतंत्राला फायदा होणार आहे, निकल आणि झिंकच्या किंमतींना देखील आधार झाला. २०२० च्या प्रारंभिक महिन्यांमधील घसरणीनंतर चीनची इन्फ्रास्ट्रक्चर-केंद्रित स्टिम्युलस पॅकेजिस आणि उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील सुस्पष्ट रिकव्हरी यामुळे औद्योगिक धातूंचे भाव वाढले. शिवाय, यूएस आणि युरोझोन मधील मागणीत सुधारणेची लक्षणे दिसू लागल्यानेही बेस मेटल किंमतीतील घसरण सावरली आणि मर्यादित राहिली.


--- प्रथमेश माल्या, गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष, एंजल ब्रोकिंग लिमिटेड 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com