Top Post Ad

मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार- जितेन्द्र आव्हाड

मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार- जितेन्द्र आव्हाड


c


ठाण्यात परवडणाऱ्या दरातील घरं उभारणार असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली 
म्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत, मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार
मायानगरी मुंबईत आपल्या स्वत:चं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार असल्याचं, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. म्हाडातर्फे मुंबई-ठाण्यात परवडणाऱ्या दरातील घरं उभारणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. म्हाडा मुंबईतील मोकळ्या जागा खरेदी करुन त्याजागी परवडणाऱ्या दरात घरं उभारणार असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 


जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक मंत्री आपल्या पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार घेतात. जितेंद्र आव्हाडांनी आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जनता दरबार घेतला. यावेळी ते बोलत होते.


पूर्व उपनगरातील टागोर आणि कन्नमवार नगर या भागात मोठ्या वसाहती उभ्या करण्याचा मानस गृहनिर्माण मंत्र्यांचा आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व माननीय मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच मुंबई उपनगरात रिकामे असलेले भूखंड ताब्यात घेणार आहे.


मुंबईत जे रिक्त भूखंड आहेत, त्याबाबतचे वाद न्यायप्रविष्ठ आहेत. अशा वाद असलेल्या जमिनी ताब्यात घेऊन परवडणारी घरं बांधता येतील, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घर/सदनिका उपलब्ध करुन देता येतील. म्हाडाने 30 ते 40 वर्षापूर्वी कन्नमवार नगरसारख्या भागात म्हाडाच्या गांधीनगर, मोतीलाल नगर यासारख्या 56 वसाहती उभ्या केल्या असल्याचं आव्हाड म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1