सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणारी आठ दुकाने सील

सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणा-या दुकानांवर महापालिकेचा बडगा : ८ दुकाने सीलठाणे
सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करण्याबरोबरच लाॅकडाऊन नियमांचे उल्लंघन करून रात्री उशीरापर्यंत दुकाने उघडी ठेवणा-या दुकानांवर ठाणे महानगरपालिकेने कडक कारवाई केली असून या कारवाईमध्ये एकूण आठ दुकाने सील करण्यात आली. महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.
महानगरपालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीतंर्गत तलावपाळी आणि चिंतामणी चौक या परिसरात काही दुकाने रात्री सात नंतरही आपली दुकाने उघडी ठेवून लाॅकडाऊनच्या नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याच्या तक्रारी महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या.
त्या तक्रारीच्या अनुषंगाने उप आयुक्त (अतिक्रमण) अशोक बुरपल्ले यांनी आज संध्याकाळी अतिक्रमण पथकाच्या साहाय्याने एकूण ८ दुकानांवर कारवाई करून ती दुकाने सील केली. या दुकानांमध्ये पिझ्झा, सॅंडविचेस, कुल्फी, आयस्क्रीम आदी दुकानांचा समावेश आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA