MSEB लोकमान्यनगर डिव्हिजनचे अधिकारी यांच्याशी व्यापक चर्चा
प्रभागातील प्रलंबित कामांना गती मिळणार...
ठाणे
लोकमान्यनगर-शास्त्रीनगर मधील कित्येक वर्षे प्रलंबित-अपूर्ण असलेल्या विविध कामांसंदर्भात "महावितरण" महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या लोकमान्यनगर डिव्हिजन चे कार्यकारी अभियंता सोनावणे, उपअभियंता मंत्री यांच्या सोबत १७ सप्टेंबर रोजी "अमिझरा" येथील जनसंपर्क कार्यालयात नगरसेवक,माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रभागातील सहकारी नगरसेवक-श्री.दिगंबर ठाकूर,माजी परिवहन सदस्य संतोष पाटील, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, युवा कार्यकर्ते संदीप घोगरे, प्रशांत(राजा)जाधवर, पुरुषोत्तम(पप्या)ठाकूर उपस्थित होते.
सदर बैठकीत प्रस्तावित डी.पी.डी.सी मंजुरीसाठी प्रलंबित असलेल्या कामांव्यतिरिक्त डिव्हिजन अंतर्गत येणाऱ्या कामांचा आढावा घेत मागील आठवड्यात सर्व्हे केलेल्या * लोकमान्यनगर पाडा नं-४ मधील रॉयल कॉलनी-नवरंग चाळ ते सोरटे हाऊस येथील संपूर्ण परिसरातील अंदाजे ७ जुने लोखंडी पोल काढून, त्यावरील वायर चे जाळे काढून,खराब व नादुरुस्त असलेल्या डी.पी काढून सर्व चाळ परिसरात अंडरग्राउंड केबल टाकणे या कामाला प्रत्यक्ष सुरवात येत्या सोमवार-मंगळवार पासून सुरुवात करण्यात येणार आहे.त्यामुळे तेथील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
* रेल्वे कॉलनी ते दत्तछाया रहिवासी चाळ येथील सर्व्हेक्षण करून पोल व केबल चे जाळे काढून त्या ही वायर भूमिगत टाकण्यात येणार आहेत. * लोकमान्य पाडा नं-४ येथील पोलीस बिट मागील सार्वजनिक शौचालय ,ओपन जिम परिसरात ठा.म.पा च्या मंजुरी मिळालेल्या बहुउद्देशीय "आरोग्य केंद्र" जागेवर असणारे ट्रान्सफॉर्मर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा कामाला ही गती मिळणार आहे. * पाडा नं-४ मधील रेल्वे कॉलनी लगत भिंतीवर असणारी केबल हटविण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. * राजा शिवाजी शाळा जवळील सदगुरू व्यापारी संघटना कार्यालय जवळील पोल काढणे, * एकरूप रहिवासी संघ येथील नाल्या वरील २ पोल काढणे, प्रगती-सिद्धिविनायक चाळ येथील इ.कामांची मागणी नगरसेवक दिगंबर ठाकूर यांनी केली.
यावेळी * शिवशंकर चाळ आतील १ पोल काढणे,इ.मंजूर कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच * गणेशनगर-परेरानगर येथील कामांचा पाठपुरावा करणे. * परेरानगर येथील डी.पी.डी.सी अंतर्गत मंजुरी साठी प्रलंबित असलेल्या ७ कामांचा आढावा घेऊन मंजुरी साठी पाठपुरावा करण्यासाठी युवा कार्यकर्ते संदीप घोगरे आग्रही होते. नादुरुस्त डी.पी नागरिकांनी फोटो सहित अनेक वेळा अर्ज देऊन सुद्दा अजून कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.
यावर संतोष पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत वीज मंडळ भरमसाठ बील मात्र घेते मग मेंटेनन्स का,करीत नाहीत ? यावर आक्षेप घेतला. त्यावर उप अभियंता-मंत्री यांनी झांजेनगर,बेकरी रोड, विश्वकर्मा मंदिर रोड परिसराचा सर्व्हे करून नादुरुस्त आणि धोकादायक अंदाजे १२ डी.पी. वाबत योग्य तो निर्णय घेऊ असे सांगितले.
* M.S.E.B ची मंजूर कामे सुदधा प्रत्येक कामाला वेग वेगळे ठेकेदार असल्यामूळे कामे रखडली असल्याचे कार्यकारी अभियंता सोनावणे यांनी सांगितले. विश्वकर्मा मंदिर जवळील पोल काढणे,नवजीवन येथील तसेच परिसरातील इमारत लगत चे पोल काढून केबल चे जाळे हटविण्यात यावे, 80% खराब असणाऱ्या डी.पी त्वरित हटविण्याची मागणी संतोष पाटील यांनी केली. * गणपती मंदिर जवळील "गुरुकृपा"ईमारत मधील गल्लीत असणारी खराब आणि जळलेली केबल अनेक वेळा सांगून ही दुरुस्ती केली जात नाही,परिणामी पावसात केबल जवळ स्पार्क होऊन मोठे स्फोट होतात,त्यामुळे इमारती ना हादरा बसतो व जीवितहानी होण्याची भीती ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक यांनी व्यक्त केली. उपस्थित कामांसंदर्भात जी कामे कार्यकारी अभियंता- सोनावणे यांच्या अख्यारीत आहेत,ती त्यांनी तातडीने पूर्ण करावी व जिथे सर्कल किंवा डी.पी.डी.सी येथे सहकार्य लागल्यास फोन वरून किंवा प्रत्यक्ष भेटून आवश्यकता पडेल तेथे मी स्वतःमंजुरी साठी तुम्हाला सहकार्य करण्याची तयारी हणमंत जगदाळे यांनी दर्शविली, तसेच उपस्थितांचे आभार मानून महत्त्वाची बैठक पार पाडली.
जाहिरात ------------------------------------------------------------------------
| मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन केंद्र |
| जमिन खरेदी, विक्री, कुळ कायदा, भू-संपादन, वारसाहक्क, |
| जमिनीचे वाटप, बिनशेती, इनाम, वतन, नवीन शर्त जमिन, |
| दाखले, परवाने, सरकारी गृहनिर्माण सोसायटी योजना |
| इत्यादींबाबत मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन |
| दररोज दुपारी ३ ते ५ (रविवारी बंद) |
| गाळा क्र.५१, दादोजी कोंडदेव स्टेडियम, नागसेन नगर, |
| सिडको रोड, ठाणे (पश्चिम), ४०० ६०१. |
|-------------------------------------------------------------------------------
0 टिप्पण्या