लोकप्रतिनिधीं आणि मनपा अधिकाऱ्यांची करणी धारावीत भरलं पाणी
मुंबई
पावसाने मुंबईकरांना जोरदार दणका दिला मंगळवार रात्रीसह बुधवारी दिवसभर सुरु असलेल्या जोरदार ते मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे धारावीतील नागरिकांना रात्र पाण्यात काढावी लागली. मागील काही वर्षे धारावीतील विशेष करून मुकुंदराव आंबेडकर नगर आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी साठत नव्हते. मात्र मागील दोन वर्षापासून या परिसरात केवळ एक दिवस आणि रात्र पाऊस पडला तर घरामधून पाणी साठत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. महानगर पालिका जी/उतर विभाग व स्थानिक नगरसेवक यांची करणी धारावी प्रभागात घरोघरी भरले पाणी असे येथील रहिवाशी बोलत आहेत.
धारावी प्रभाग क्रं.१८६ मध्ये रहिवाशांना या पावसामुळे अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. स्थानिक नगरसेवक व मनपाची नालेसफाई फक्त कागदावरच असल्यामुळे पुन्हा एकदा २६ जुलै घडतेय की काय अशी भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली संपुर्ण देशात कोवीड १९ महामारी असताना सुध्दा धारावीतील जनतेने धैर्याने सदर परिस्थितीला तोडं दिले. पंरतु पावसाळी नाले साफ न करता फक्त कागदोपत्री नाले साफ करण्यात आल्यामुळे गेल्या संततधार पावसाने मुकुंदराव आंबेडकर नगर ,शास्त्री नगर ह्या परीसरातील रहिवाशाना पाण्यामध्ये दिवस-रात्र काढण्याची वेळ आली. स्थानिक लोकप्रतिनिधी व जी/उतर विभागातील मनपा अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे ही वेळ आली असल्याचा आरोप नागरिकांनी केला. महानगर पालिका जी/उतर विभाग व स्थानिक नगरसेवक यांची करणी प्रभाग क्रं.१८६ मध्ये घरोघरी भरले पाणी असे मत येथील नागरिकांनी मांडले.
बुधवारची संध्याकाळ उजाडली तरीदेखील पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. त्यामुळे दिवसभर लागून राहिलेल्या पावसाने धारावीकरांना धडकीच भरविली होती. एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पाऊस; अशा दुहेरी संकटात येथील रहिवाशी सापडले आहेत. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार ते मध्यम स्वरुपात कोसळलेल्या पावसामुळे पाण्याचा निचरा देखील होत नव्हता. पाण्याचा लवकर निचरा होत नसल्याने हेच पाणी लगतच्या वस्त्यांमध्ये शिरत होते.आणि रहिवासी वस्त्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र होते. सकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने येथील पाण्याचा ब-यापैकी निचरा झाला होता. मात्र दुपारी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला.आणि पुन्हा परिसरात पाणी साचते की काय? याची धडकी नागरिकांना लागून राहिली.
0 टिप्पण्या