Top Post Ad

ठाणे जिल्हा परिषदेची जनावरांकरिता रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम

जनावरांचे लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरण
ठाणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाची मोहीम


ठाणे
ठाणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागा मार्फत जनावरांना लाळ खुरकुत रोग होऊ नये यासाठी राष्ट्रीय पशुनियंत्रक कार्यक्रमातर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. सोबतच जनावरांचे टॅगिंग (जनावरांच्या कानात बिल्ला टोचणे) करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पशुपालकांनी आपल्या जनावरांना लस आणि  टॅगिंग करून घेण्याचे आवाहन कृषि,पशु व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे यांनी  केले.


1 सप्टेंबर पासून ही मोहीम सुरु झाली असून पुढील पंचेचाळीस दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे. नुकतेच कृषि,पशु व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे यांच्या उपस्थितीत मौजे दळखण गावात जनावरांना लस टोचण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवराम भगत, उप सभापती (शहापूर) पशुसंवर्धन जगनाथ पष्टे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार, डॉ. अश्विनी पावरा, डॉ. दर्शन दळवी, डॉ. अमोल सरोदे, डॉ. करण, डॉ. शिंदे इतर अधिकारी कर्मचारी, गावातील पशुपालक उपस्थित होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील  गाई, बैल, म्हैस, आणि रेडे यांना लाळखुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. यासोबतच इनाफ अंतर्गत जनावरांचे टॅगिंग ( जनावरांच्या कानात बिल्ला टोचणे) करण्यात येत आहे. 


ही मोहीम टप्याटप्याने राबविण्यात येत असून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनावरांचे शंभर टक्के लसीकरण आणि टॅगिंग करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  यासाठी 1 लाख एवढी मुबलक लस उपलब्ध करण्यात आलेली आहे. ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार यांनी हा मोहिमेचे नियोजन केले आहे. तालुका स्तरावरील पशुवैदकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या  सहकार्याने ही मोहीम यशस्वी होईल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. 


-------------------


ठाणे जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्ताधिकारी गीता नागर यांची बदली
ठाणे
ठाणे जिल्हा परिषद येथे कार्यरत असणाऱ्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांची पुणे येथील सारथी संस्थेच्या लेखापाल पदी बदली झाली. जिल्हा परिषदेच्या सेवा कार्यकाळात त्यांनी जिल्हा परिषदेला वित्तीय शिस्त लावून आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी विशेष योगदान दिले. श्रीमती नागर यांनी साधारण तीन वर्षे जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी  म्हणून कामकाज पाहिले. या पदावर काम करताना विविध विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भरीव निधीची तरतूद जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात वेळोवेळी केली. त्यांच्या कार्यकाळात महिला बाल कल्याण, समाजकल्याण, पशुसंवर्धन विभागाने नाविन्यपूर्ण योजना राबविल्या. पाणी पुरवठा विभागा अंतर्गत बंद पडलेल्या योजना पुनर्जीवित करण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद केली. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्न निधीतही वाढ झाली यासाठी त्यांचे विशेष योगदान आहे.  जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाचे प्रमुख म्हणून काम करताना जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाच्या कामकाजात गतीमानता आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच  अर्थ विभागातील  कर्मचाऱ्यांना शासन नियमाप्रमाणे मिळणारी  पदोन्नती आणि इतर लाभ देखील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यकाळात मिळाले. गेल्या तीन वर्षात जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.


  


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com