वाढत्या चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी

वासिंदमध्ये वाढत्या चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस गस्तीत वाढ करा

सीसीटीव्ही कॅमेरे बसवा -  वंचित बहुजन आघाडीची मागणी

 

शहापूर
शहापूर तालुक्यातील वासिंद शहरात घरफोडी, दुकानफोडी तसेच दिवसा ढवळ्या चैन चोरीचे प्रमाण वाढले असून चोरांवर अंकुश ठेवण्यासाठी वासिंद ग्रामपंचायततीने चौक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तसेच होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीसांनी रात्रीच्या वेळेच्या पोलीस गस्तीत वाढ करावी या मागणीचे लेखी निवेदन गुरुवारी (४ सप्टेंबर) वंचित बहुजन आघाडी वासिंद शहर अध्यक्ष योगेश साळवे यांचेकडून वासिंद ग्रामपंचायत सरपंच लता शिंगवे तसेच वासिंद पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांना देण्यात आले.

 

मुंबई ते कसारा या मध्ये रेल्वेच्या प्रमुख स्थानी असलेल्या वासिंद गावची लोकसंख्या, औद्योगीकरण, मोठ्या प्रमाणात होणार इमारत बांधकाम झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे घरफोडी, दुकानफोडी, दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील मौल्यवान सोन्याचे दागिने लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. या वाढत्या गुन्हेगारांना तसेच  चोरीला आळा घालण्यासाठी वासिंद शहरातील प्रत्येक चौकात तसेच वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत वासिंदकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तसेच होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीसांनी रात्रीच्या वेळेच्या पोलीस गस्तीत वाढ करावी या मागणीचे लेखी निवेदन गुरुवारी वंचित बहुजन आघाडी वासिंद शहर अध्यक्ष योगेश साळवे यांचेकडून वासिंद ग्रामपंचायत सरपंच लता शिंगवे तसेच वासिंद पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गुरव यांना देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक नरेश उबाळे , वासिंद शहर अध्यक्ष योगेश साळवे ,वासिंद महासचिव महेश भालेराव, उपाध्यक्ष जयवंत बागुल, विभागीय अध्यक्ष रवी जाधव, विभागीय महासचिव भुषण केदारे  कार्यकर्ते किरण जाधव , बाळु हिरे , तसेच शामलाल बागुल आदी उपस्थित होते. 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या