Top Post Ad

भारत-चीन सीमेवरील तणावामुळे शेअर बाजाराची घसरण

भारत-चीन सीमेवरील तणावामुळे शेअर बाजाराची घसरण
निफ्टी २६०.१० तर सेन्सेक्सची ८०० अंकांची घसरण 



मुंबई
भारत-चीन सीमेवरील तणावामुळे भारतीय निर्देशांकात आजच्या व्यापारी सत्रात नफ्यावर परिणाम झाला व तो २ टक्क्यांनी घसरला. निफ्टी २.२३% किंवा २६०.१० अंकांनी घसरला आणि ११,३८७.५० वर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स २.१३% किंवा ८३९.०२ अंकांनी कमी होऊन ३८,६२८.२९ वर बंद झाला. आजच्या व्यापारी सत्रात फ्युचर रिटेल (१९.९९%), ओएनजीसी (१.९९%), फ्युचर कंझ्युमर लि. (४.८०%) हे आजचे टॉप गेनर्स ठरले. तर भारती एअरटेल (-२.१०%), रिलायन्स इंडस्ट्रिज (-२.१८%), आणि इंडसइंड बँक (-५.१३%) हे सक्रियतेने व्यापार झालेले आणि दिवसातील सर्वाधिक नुकसान झालेले शेअर्स ठरले. सर्वच क्षेत्रात घसरण दिसून आली. मेटल आणि फार्मा निर्देशांक अनुक्रमे ४.३% आणि ५.२% नी घसरले. तर निफ्टी ऑटो ३.६% नी घसरले. अशी माहिती एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार  अमर देव सिंह यांनी दिली. 


भारतीय रुपया: भारतीय रुपयाने देशांतर्गत इक्विटी बाजारातील अस्थिरतेमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत थोडीशी घट घेत ७३.६२ रुपयांचे मूल्य कमावले.
फ्युचर रिटेल लि.: रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडने किरकोळ आणि घाऊक व्यापारासह कंपनीच्या लॉजिस्टिक आणि वेअरहौसिंग व्यवसायासह २४,७१३ कोटी रुपयांची खरेदी केली. कंपनीच्या शेअर्समध्ये १९.९९% ची वृद्धी झाली व त्यांनी १६२.३५ रुपयांवर व्यापार केला.
एनएचपीसी लिमिटेड: कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा १७% नी घसरला तर कंपनीचा एकत्रित महसूल ६.५% नी वाढला. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ४.४१% नी घसरण झाली व त्यांनी २१.७० रुपयांवर व्यापार केला.
सुझलॉन एनर्जी लिमिटेड: कंपनीचे एप्रिल ते जून या तिमाहीत एकत्रित निव्वळ नुकसान ३९८ कोटी रुपयांवर गेले. कंपनीच्या शेअर्समध्ये १.३०% घट झाली व त्यांनी ३.८० रुपयांवर व्यापार केला.


रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड: कंपनीने नुकतेच किशोर बियाणी समर्थित फ्युचर ग्रुपचे किरकोळ, घाऊक वस्तू, लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस व्यवसाय विकत घेतले. तरीही कंपनीचे स्टॉक्स २.१८% नी घसरले व त्यांनी २,०७०.०० रुपयांवर व्यापार केला.
जागतिक बाजार: आजच्या सत्रात आशियाई आणि युरोपियन निर्देशांकांची संमिश्र कामगिरी दिसून आली. अमेरिकी चलन धोरणांच्या संकेतांनी जागतिक जोखीम मालमत्तांना चालना दिली. नॅसडॅक, एफटीएसई एमआयबी आणि निक्केई २२५ च्या शेअर्समध्ये अनुक्रमे ०.६०%, ०.४८% आणि १.१२% ची वृद्धी झाली. तर एफटीएसई १०० आणि हँगसेंग कंपनीच्या शेअर्समध्ये अनुक्रमे ०.६१% आणि ०.९६% ची घट दिसून आली.


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com