सहकारी व खासगी बँकांच्या १०% मर्यादेपर्यंत कर्मचार्यांना उपनगरी रेल्वे प्रवास करण्याची परवानगी
मुंबई
राज्य सरकारच्या विनंतीवरून आणि रेल्वे मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून मिळालेल्या परवानगीनुसार, सर्व सहकारी व खासगी बँकांच्या कर्मचार्यांना महाराष्ट्र राज्य शासनाने मंजूर केल्याप्रमाणे एकूण कर्मचार्यांच्या १०% मर्यादेपर्यंत कर्मचार्यांना मुंबई उपनगरी नेटवर्कवर विशेष उपनगरी सेवेद्वारे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निवडक १०% बँक कर्मचार्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारकडून, स्टेशन प्रवेशासाठी, लवकरात लवकर क्यूआर कोड मिळवावा. तोपर्यंत वैध ओळखपत्रासह स्थानकांवर प्रवेश देण्यात येईल. महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी अतिरिक्त बुकिंग काऊंटर सुरू केले जातील.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक प्रवर्गातील कर्मचारी वगळता इतरांनी स्थानकांवर गर्दी करू नये अशी विनंती केली जाते. प्रवाशांना कोविड-१९ साठी अनिवार्यपणे वैद्यकीय आणि सामाजिक प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याची विनंती केली जाते.
जनतेला विनंती आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.असे आवाहन १९ सप्टेंबर रोजी ( प्रप क्रमांक 2020/09/33)
मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांचे द्वारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
0 टिप्पण्या