पाणी बिलांमधील घोळ दूर करण्यासाठी ठामपाची विशेष मोहिम

पाणी बिलांमधील त्रुटी दूर करण्यासाठी 21 सप्टेंबरपासून विशेष  मोहिम
नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, महापालिका आयुक्तांच आवाहन


ठाणे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्याने व या कामांमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी व्यस्त झाल्याने ठाणे महापालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना पाण्याच्या नळ संयोजनाची देयके या आर्थिक वर्षामध्ये (सन 2020-21) ऑगस्ट अखेरपर्यत देण्यात आली आहेत. परंतु या देयकामध्ये त्रुटी क्षेत्रफळ, कुटूंब संख्या, सदनिका संख्या, थकबाकी रक्कम, प्रशासकीय आकाराची रक्कम याबाबत त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, या त्रुटी दूर करण्यासाठी 21 सप्टेंबर 2020 पासून विशेष मोहिम राबविण्यात असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.‍विपीन शर्मा यांनी केले आहे.


       या त्रुटी दूर करण्यासाठी नागरिकांनी आपल्या नजीकच्या प्रभाग समिती कार्यालयामध्ये कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यत व दर शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, मिटर रिडर यांच्याकडे प्राप्त झालेले पाणी बिल व इतर सर्व कागदपत्रांसह समक्ष जाऊन बिलामधील त्रुटी दूर करण्यासाठी सहकार्य करावे.‍बिलांमधील त्रुटी दूर करुन संबंधित ग्राहकांना सुधारीत बिल देण्यांत येणार आहे. तरी नागरिकांनी या विशेष मोहिमेतंर्गत आपल्या बिलांमधील त्रुटी दूर करण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.


 


 


जाहिरात ------------------------------------------------------------------------
मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन केंद्र    |
जमिन खरेदी, विक्री, कुळ कायदा, भू-संपादन, वारसाहक्क,            |
|  जमिनीचे वाटप, बिनशेती, इनाम, वतन, नवीन शर्त जमिन,           |
|  दाखले, परवाने, सरकारी गृहनिर्माण सोसायटी योजना                   | 
|  इत्यादींबाबत मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन                       |
दररोज दुपारी ३ ते ५ (रविवारी बंद)                                             |
गाळा क्र.५१, दादोजी कोंडदेव स्टेडियम, नागसेन नगर,                  |
|  सिडको रोड, ठाणे (पश्चिम), ४०० ६०१.                                       | 
|-------------------------------------------------------------------------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA