Top Post Ad

जिल्हा परिषद विषय समिती सभापतींचे खाते वाटप

जिल्हा परिषद विषय समिती सभापतींचे खाते वाटप


ठाणे.
पीठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी यांनी आयोजित केलेल्या दि.१५ जुलै २०२० आणि दि.३० जुलै २०२० च्या निवडणूकीमध्ये निवड झालेल्या उपाध्यक्ष तसेच विषय समितीचे सभापती यांना जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी प्रभार सोपविला होता त्यास आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत मान्यता  देऊन  विविध विषय समिती सभापतींना खाते वाटप करण्यात आले. यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा परिषद सर्वसाधारण विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) डी. वाय. जाधव (तथा सदस्य सचिव) तसेच जिल्हा परिषद सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.


यावेळी उपाध्यक्ष तसेच विषय समितीचे सभापती यांना खालीलप्रमाणे खाते वाटप करण्यात आले. 
१) सुभाष पवार यांना अर्थ व शिक्षण समिती
२) कुंदन पाटील यांना बांधकाम व आरोग्य समिती 
३) संजय निमसे यांना कृषी,पशुसंवर्धन, व दुग्धशाळा समिती
ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती पदी रत्नप्रभा तारमळे, तर समाजकल्याण समिती सभापती पदी नंदा उघडा यांची यापूर्वीच पदसिध्द सभापती म्हणून निवड झालेली आहे.  तसेच या सभेत विविध समित्यांवर रिक्त झालेल्या सदस्यांची पद भरण्याबाबत मंजुरी देण्यात आली. शासनाने निर्गमित केलेल्या कोव्हिड १९ चे नियम पाळून सभा घेण्यात आली.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1