ड्रग्ज प्रकरणात कंगना रनौतचा संबंध, पोलिस घेणार माहिती

ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौतचा काही संबंध आहे का, पोलिस घेणार माहिती


मुंबई
कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यान, मुंबईचा अवमान करणाऱ्या अभिनेत्रीला मुंबईत राहू देणार नाही, अशी धमकीही शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर कंगनाला केंद्रीय गृहविभागाने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. तरीही मुंबईत कंगना रानौतच्या संरक्षणाची जबाबदारी करणी सेना घेत असल्याची ग्वाही संघटनेचे जीवन सोलंकी यांनी दिली आहे. कंगना मुंबईच्या विमानतळावर आल्यापासून तिच्या घरी पोहोचेपर्यंत करणी सेनेचे पथक तिच्या संरक्षणासाठी तिच्याबरोबर असेल आणि त्यानंतरही शहरात आम्ही तिला संरक्षण देऊ, असे त्यांनी संगितले. कंगना आणि शिवसेनेतील वादाच्या पार्श्वभूमीवर करणी सेनेने तिच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आहे. हिमाचल प्रदेश सरकारनेही कंगनाला सुरक्षा व्यवस्था देऊ केली आहे. दरम्यान, मुंबईचा अवमान करणारे विधान केल्याबद्दल कंगनाच्या विरोधात अंधेरी आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत.  

दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौतचा काही संबंध आहे का, याची माहिती मुंबई पोलीस घेणार असल्याचे सांगितले आहे. विधानभवनाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. दरम्यान अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर कंगना रनौतने ट्विट केले आहे. आपली ड्रग्ज चाचणी करण्याचे आव्हान दिले आहे. तसेच पुरावा सापडल्यास आपण आपली चूक मान्य करु आणि कायमची मुंबई सोडू, असे तिने म्हटले आहे. कंगनाने ट्विट करताना म्हटले आहे, 'मुंबई पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची मी आभारी आहे. कृपया माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. जर तुम्हाला ड्रग्ज तस्करांसोबत माझा कोणताही संबंध आढळला तर मी माझी चूक मान्य करेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. तुमच्यासोबतच्या भेटीची वाट पाहतेय.'


शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या कंगना रानौतविरोधात विधिमंडळात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री कंगनाच्या मुंबई विरोधी वक्तव्याचा मुद्दाही आज विधिमंडळात चांगलाच गाजला. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी कंगनाच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला. तर मुंबई पोलिसांबद्दल बेजबाबदार वक्तव्य केल्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. सिनेसृष्टीतील ईस्लामी वर्चस्व संपवल्याच्या कंगनाच्या वक्त्तव्याचा सपा आमदार अबू आझमी यांनीही निषेध केला.


दरम्यान, मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सकाळी आज कंगनाच्या ऑफीसमध्ये जाऊन नोटीस लावली. ग्राऊंड फ्लोअरवरील टॉयलेटला ऑफिस केबिन मध्ये रूपांतरीत केले आहे. स्टोअर रूमचा किचन रूम मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. तसेच ग्राऊंड फ्लोअरवर पायऱ्यांवर अनधिकृत टॉयलेट बाधले आहे. अशा तऱ्हेने  कंगनाने राहत्या घराची व्यावसायिकरित्या ऑफिसमध्ये रुपांतर केल्याने अनेक अनधिकृत गोष्टी यात केल्या असल्याची पालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे कलम ३५१ अंतर्गत पालिकेने कंगनाला या ऑफीससाठी नोटीस बजावली आहे. २४ तासात स्पष्टीकरण आणि अतिरिक्त बांधलेले बांधकाम अधिकृत असल्याचे पुरावे द्यावेत, असे आदेश पालिकेने दिले आहेत. अनधिकृत बांधकाम स्वतः काढून टाका नाही, तर पालिका हे बांधकाम तोडणार असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

 

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या