Top Post Ad

भडकाऊ भाषण दिल्याचा आरोपाखाली अटक केलेल्या डॉ.काफील यांची सुटका

सीएए आणि एनआरसी यावर भडकाऊ भाषण दिल्याचा आरोपाखाली अटक केलेल्या डॉ.काफील यांची सुटका



नवी दिल्ली.
सीएए आणि एनआरसी यावर भडकाऊ भाषण दिल्याचा आरोपाखाली अटक केलेल्या डॉ.काफील यांची त्वरीत सुटका करावी असे आदेश अलाहाबाद हायकोर्टाने मंगळवारी जारी केले आहेत. मागील सहा महिन्यांपासून मथुरा येथील जेलमध्ये कैद असलेल्या डॉ.काफील यांच्या विरोधात लावलेले राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) अंतर्गत प्रतिबंधित करण्याचे प्रकरण सुद्धा रद्द केले आहे. त्यांच्या विरोधात रासुका लावणे आणि त्याची मर्यादा वाढवणे हे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. 


हायकोर्टाने या प्रकरणाची   २८ ऑगस्ट रोजी सुनावणी पूर्ण करून निकाल राखीव ठेवला होता. अलीगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कारवाई केली होती. यानंतर या कारवाईच्या विरोधात डॉक्टर कफील यांच्या आई नुजहत परवीन यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली होती. कफील खान यांना गोरखपूर येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून २९ जानेवारी २०२० रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना तुरुंगात पाठवून त्यांच्याविरुद्धा रासुका लावण्यात आला होता. या दरम्यान दोनदा त्यांची कोठडी वाढवण्यात आली होती. न्यायालयाने या दोन्ही गोष्टी बेकायदेशीर ठरवल्या आहेत.


ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २०१७ मध्ये गोरखपूरच्या रुग्णालयात एका आठवड्यात ६० पेक्षा अधिक लहान मुलांचा मृत्यू झाला होता. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.  त्यावेळी   मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गढ असलेल्या भागातील हा मुद्दा खूप चर्चेत आला.  या कालावधीत डॉ. कफील खान चर्चेत आले होते. मात्र त्याचवेळी त्यांना ससस्पेंड करण्यात आले.त्यांच्यावर इंसेफेलाइटिस वार्डमध्ये कर्तव्यात कसूर दाखवल्याचा आरोप ठेवण्यात आला. रुग्णालय सोडून ते खासगी सेवा देतात असेही आरोप ठेवण्यात आले. याच प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.  उत्तर प्रदेश सरकारवर त्यांनी टीका केल्याने त्यांना लक्ष्य करण्यात आले अशी चर्चा त्यावेळी नागरिक करत होते. परंतु, हायकोर्टाने आता कफील यांना मोठा दिलासा दिला आहे.


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com