Top Post Ad

व्हेंचर कॅटलिस्टची ‘7 क्लासेस'मध्ये गुंतवणूक

व्हेंचर कॅटलिस्टची ‘7 क्लासेस'मध्ये गुंतवणूक


मुंबई
देशातील पहिले आणि सर्वात मोठे इंटिग्रेटेड इनक्यूबेटर व्हेंचर कॅटलिस्टने आयआयटी-बी, एनआयटी आणि सुपर३०च्या माजी विद्यार्थ्यांद्वारे स्थापित 7क्लासेस या जगातील पहिल्या निदान आधारीत ई-लर्निंग मंचामध्ये गुंतवणूक केली आहे. 7क्लासेस हा पूर्णपणे डिजिटल मंच असून आयआयटी जेईई, इंजिनिअरिंग, मेडिकल आणि ऑलंपियाडची महत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परिक्षांच्या तयारीसाठी याची उभारणी करण्यात आली आहे.एका बॅचमध्ये फक्त ७ विद्यार्थी, शिक्षकांकडून पुन्हा संवाद, दोन शिक्षकांचे शिकवण्याचे मॉडेल, शिक्षणातून आत्मविश्वासू निदान इत्यादी प्रकारचे नव-नवीन प्रयोग यात करण्यात आले आहेत. गर्दीयुक्त वर्गातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांमधील कमी आत्मविश्वास या समस्या सोडवण्यासाठी 7क्लासेसची निर्मिती करण्यात आली आहे.


व्हेंचर कॅटलिस्टचे अध्यक्ष व सहसंस्थापक अपूर्व रंजन शर्मा, म्हणाले, “7क्लासेसच्या संकल्पनेने आम्ही अत्यंत प्रभावित झालो आहोत. विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा आणणा-या मूलभूत समस्येचे निराकरण करण्याचा त्यांचा उद्देश आहे. संस्थापक समूह हा विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अडचणींमध्ये त्यांना मार्गदर्शन करण्याजोग उच्चशिक्षित आणि अनुभवी अशा प्रकारचा आहे. त्यांच्या युनिक टीचिंग मॉडेलला देशभरातील तसेच दुबई आणि अमेरिकेतील पालक व विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.”


7क्लासेसचे सहसंस्थापक अनुप राज म्हणाले, “ या निधी उभारणीद्वारे आम्हाला भारताच्या तळागळापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. या वर्षी भारत आणि दुबईतील प्रसिद्ध शैक्षणिक ब्रँड बनणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. जवळपास प्रत्येक पालक आमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि त्यांना याचा लाभ मिळू शकेल, यासाठी आत्मविश्वासपूर्ण निदान, १२-१३ भाषांतील शिक्षकांचे सबलीकरण यासाठी हा निधी वापरला जाईल. ”


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com