ब्रह्मांड कट्टयावर "चरण या आचरण" या विषयावर व्याख्यान

*ब्रह्मांड कट्टयावर "चरण या आचरण" या विषयावर व्याख्यान

 

ठाणे:   

ब्रह्मांड कट्टयावर दिनेश व्यास, मॅनेजमेंट गुरू तथा मोटीवेशन स्पीकर यांचे "चरण या आचरण" या विषयावर हिंदी भाषेतील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आजच्या भेडसावत असलेल्या समस्या व त्यावरील उपाय आणि समाधान यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

 

चरण व आचरण या बाबत बोलताना ते म्हणाले चरण म्हणजे वैयक्तिक आणि आचरण म्हणजे वागणूक या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक आहेत. आपल्या नियमित सुखकर आयुष्यात एखादी वेगळी परिस्थिती निर्माण होते व त्यामुळे जी गडबड होते ती समस्या. त्या समस्येचा विचार करून योग्य तो मार्ग काढल्यामुळे मिळते ते समाधान. समस्या सोडविण्यासाठी आपण महान व्यक्तींना आठवून त्यांच्या विचाराने प्रभावित होतो. हेच विचार आपले व्यक्तिमत्व घडवते. म्हणजेच आपल्या वागणुकीमुळे घडते ते आपल व्यक्तिमत्व चरण  व नंतर प्राप्त होते ते समाधान म्हणजे  आचरण. हा आपल्या समस्येचा व समाधानाचा गुंता श्री.दिनेश व्यास यांनी उलगडून सांगितला. आपल्याला समजलेल्या विचारांचा लाभ इतरांना होण्यासाठी आपण पुढील व्यवस्था केली जाते. व्यक्ति,विचार व व्यवस्था हे एक चक्र आहे. त्यावेळी आपण व्यक्ती व विचार याचे आपण आचरण करतो असे ते पुढे म्हणाले. 

           समस्या व समाधान या बाबत ते म्हणाले, समस्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. कालची समस्या ही आजची असेलच असे नाही. समस्या कुठल्या स्वरुपात आहे याचा विचार करायला पाहिजे.  समस्येच स्वरूप जाणून घेणे आवश्यक आहे कारण त्यातूनच मार्ग निर्माण होतात. त्यानंतर मिळते ते समाधान.  काम, कर्तव्य करणे आवश्यक आहे पण त्यापासून होणाऱ्या फायदा यावर आपला अधिकार असतोच असे नाही. आपण कर्तव्य करत असताना फळाची अपेक्षा करावी पण जेंव्हा आपण आपली जबाबदारी ओळखून कर्म करतो त्यावेळी फळ निश्चित मिळते आणि लाभते ते समाधान. म्हणजेच समस्या आणि समाधान म्हणजेच आचरण हे पुन्हा एकदा सिद्ध केले. 

            आताच्या तरूण पिढीला दिलेल्या संदेशात व्यास म्हणाले की आजची तरूण पिढी ही अत्यंत बुद्धिमान आहे. त्यांना पालकांनी सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत आणि देणार आहेत. त्यांनी आपले कर्तव्य, अध्ययन जबाबदारी ओळखून करणे आवश्यक आहे. त्यातून जर असफलता मिळाली तरी नाराज न होता  पालकांच्या मदतीने पुन्हा प्रयत्न करावा.  आसक्ती हे समस्येचे मूळ कारण आहे . वाचन, ऐकणे, लिखाण यातूनच बुध्दी प्रगल्भ होते व एकाग्रता वाढते विचार करण्याची शक्ती वाढते आसक्ती वर नियंत्रण मिळवता येते. यातूनच निर्माण होते एक सुंदर व्यक्तिमत्व व आयुष्यात मिळते समाधान. अशा प्रकारे श्री व्यास यांनी "चरण या आचरण " या विषयाची सांगता केली. 

             करोनाच्या महामारी मुळे निर्माण  झालेल्या  परिस्थितीमुळे ब्रह्मांड कट्टा ऑन लाईन लाईव्ह कार्यक्रम सादर करीत आहेत  रविवार  दिनांक 20 सप्टेंबर 2020 रोजी आयोजित ब्रह्मांड कट्टा हा ५ वा होता. परिस्थिती मुळे निर्माण झालेल्या समस्येवर ब्रह्मांड कट्टयाने  शोधलेला उपाय व रसिकांना मिळालेले समाधान म्हणजेच "चरण व आचरण "  कार्यक्रमाच्या सुरवातीला गायक श्री. जितेंद्र तांबे यांनी "कही दूर जब दिन ढल जाये " व"मेरे दिलने तडपते जब नाम तेरा पुकारा " ही दोन गाणी गाऊन संगीतमय वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक राजेश जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले तर आभार अध्यक्ष महेश जोशी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA