Top Post Ad

ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांची विकास कामांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा

ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी कल्याण पंचायत समिती इमारत दुरुस्तीची केली पाहणी
कल्याण तालुक्याचा दौरा करत विकास कामांबाबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी केली चर्चा


ठाणे
गेल्या काही दिवसांपासून कल्याण पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीचे दुरुस्ती काम सुरु आहे. हे काम वेळेत पूर्ण करून येथील अधिकारी- कर्मचारी यांना सुरक्षित छताखाली काम करता येईल अशी परिस्थिती निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी आज कल्याण पंचायत समिती कार्यालयाला भेट देऊन दुरुस्ती करण्यात येत असलेल्या इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी इमारतीच्या दुरुस्तीचे काम व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण करण्याची सूचना केली. 


कल्याण पंचायत समिती कार्यालयाचा काही भाग धोकादायक असून हा भाग बंद करण्यात आलेला आहे. जो भाग जुना आहे मात्र धोकादायक नाही अशा भागाची जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा मार्फत दुरुस्ती करण्यात येत आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीचा जुना भाग दुरुस्त करून इमारत बळकट करणे गरजेचे होते.ते काम सध्या सुरु आहे. दरम्यान  श्रीमती लोणे यांनी दुरुस्तीकामा संदर्भात कार्यकारी अभियंता (बांधकाम)  नितीन पालवे, गट विकास अधिकारी श्वेता पालवे आणि ठेकेदार यांच्याशी चर्चा केली. यावेळी उप सभापती रमेश बांगर उपस्थित होते.  


या पाहणी दौऱ्यासह त्यांनी  कल्याण तालुक्याचा दौरा करत विकास कामांबाबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये वालकस बेहरे भूसंपादना संदर्भात प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत आणि मागील वर्षीच्या पुरात ज्या नागरिकांचे नुकसान झाले होते त्यांना योग्य तो आर्थिक मोबदला मिळावा यासाठी त्यांनी कल्याण प्रांत आणि तहसीलदार यांच्याशी शासकीय विश्रामगृह येथे चर्चा केली. त्याचबरोबर कल्याण ग्रामीण भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो, या बाबत नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. नागरिकांची ही समस्या दूरव्हावी याकरिता त्यांनी विद्युत महामंडळ अभियंताशी चर्चा केली.  


श्रीमती लोणे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यनंतर त्यांनी ताबोडतोब जिल्हयाच्या ग्रामीण भागाचा दौरा केला. सध्याच्या कोव्हीड काळात देखील त्यांनी विविध गावांना भेटी दिल्या.  नागरिकांच्या समस्या जाणून समस्यांचे निराकरण करण्यासाठी अग्रेसर राहिल्या. कोव्हीड काळात कोव्हीड केअर सेन्टरवर जाऊन कोरोनाग्रस्थांची आस्थेने विचारपूस केली. जिल्हाचा ग्रामीण भाग कोरोनामुक्त होण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणाना नेहमीच त्या  मार्गदर्शन करत आहेत.


---------------------



 ठाणे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ) या पदावर  अजिंक्य पवार रुजू झाल्याने महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक संवर्गीय कर्मचारी संघटना ६१५, जिल्हा शाखा ठाणे यांनी सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले. यावेळी संघटनेचे  जिल्हा अध्यक्ष प्रकाश म्हाळुंगे, सचिव संदेश म्हस्के, कार्याध्यक्ष मनोहर शेजवळ, उपाध्यक्ष अजय भोंडीवले, कोषाध्यक्ष संजय कवडे, प्रमुख सल्लागार दिलीप भराडे, सहचिव शंकर आरे, संजय शिंदे, प्रसिद्धी प्रमुख पद्माकर राठोड, विनय दाभाडे, महिला संघटक शुभांगी रावत, विद्या विचारे, कल्पना तोरवणे, अपर्णा हरपले, उपस्थित होत्या. 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com