ठाणे काँग्रेस शहर (जिल्हा) कमिटीची जम्बो जम्बो कार्यकारीणी जाहीर
ठाणे
ठाणे काँग्रेस शहर(जिल्हा)कमिटीची ४५ उपाध्यक्ष, ५७ सरचिटणीस, १०२ चिटणीस, २१ कार्यकारीणी सदस्य, २७ सल्लागार असलेली जम्बो कार्यकारीणी आज १८ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक जुन्या नव्या कार्यकर्त्यांना संधी देत असताना पक्षाचे काही माजी नगरसेवक,ठाणे महापालिका सदस्य यांच्याबरोबरच महिलांनाही प्राधान्य देण्याचा प्रयत्न यात केला गेला आहे एकूण 252 पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणी मध्ये सर्वसाधारण गटातील 116 इतर वर्गातील एकुण 36 कार्यकर्त्यांना शहर कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.
आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागात संघटना बांधण्याचा प्रयत्न करीत असताना प्रभागातील प्रमुखांना ठाणे शहर कार्यकारिणीवर संधी घेऊन आगामी ठाणे महापालिका निवडणुकीची ही पूर्वतयारी असल्याची सुरुवात असेल असे याठिकाणी आणि आवर्जून नमूद करीत आहे.काॅग्रेस पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रीय असलेल्या जेष्ठ पदाधिकारी/कार्यकर्त्याची एक सल्लागार समिती बनविण्यात आली असून वेळोवेळी या समितीचा सल्ला घेण्यात येणार आहे. नव्यानं गठित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहे. एकूणच सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. तसेच ही कार्यकारिणी गठीथ करीत असताना पक्षांतर्गत असलेल्या ब्लॉक रचने प्रमाणे कार्यकारिणीचा समतोल राखला गेला असल्याचा आशावाद ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केला.
शहर कार्यकारीणीत सरचिटणीस म्हणून सचिन शिंदे हे संपूर्ण प्रशासकीय कामकाज पाहणार असून जिल्हा काँग्रेसचा मुख्य प्रवक्ता म्हणूनही ते आपणास समवेत संपर्कात राहतील परंतु इतरही उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, कार्यकारिणी सदस्य यांनाही महत्वपूर्ण जबाबदारी लवकरच देण्यात येईल यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या निर्देशानुसार प्रामुख्याने ब्लॉक समन्वयक,पक्षांतर्गत असलेले विविध सेल/ विभाग समन्वयक,प्रभाग समन्वयक अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत प्रामुख्याने बुथ स्तरापासूनच काँग्रेस पक्षीय संघटना बांधणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून ही शहर कार्यकारणी कार्यरत राहील भविष्यात काँग्रेस अधिकाधिक व्यापक स्वरूप धारण करेल असा विश्वास उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला. जिल्हास्तरीय विविध शासकीय समित्या,विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्ती बाबतही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पुढाकार घेऊन या नियुक्त्या लवकरात लवकर कशा होतील याकरिता प्रयत्न केले आहे.*
जाहिरात ------------------------------------------------------------------------
| मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन केंद्र
| जमिन खरेदी, विक्री, कुळ कायदा, भू-संपादन, वारसाहक्क,
| जमिनीचे वाटप, बिनशेती, इनाम, वतन, नवीन शर्त जमिन,
| दाखले, परवाने, सरकारी गृहनिर्माण सोसायटी योजना
| इत्यादींबाबत मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन
| दररोज दुपारी 3 ते 5 (रविवारी बंद)
| " प्रजासत्ताक जनता" कार्यालय, 51, दादोजी कोंडदेव स्टेडियम,
| नागसेन नगर, सिडको रोड, ठाणे (पश्चिम), ४०० ६०१.
|-------------------------------------------------------------------------------
0 टिप्पण्या