कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा पुढाकार
उरण
रसायनी एम.आय.डी.सी., चावणे विभागातील ह्युडाई मोटर कंपनीचे मोबीस इंडिया स्पेअर पार्ट्सच्या गोडावूनमध्ये गेल्या सहा वर्षापासुन १२२ कामगार काम करित आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी १२२ कामगारांपैकी फक्त 54 कामगार कंपनीत काम करतील अशी कंपनीच्या गेटवर नोटिस लावल्याने सर्व कामगार एकत्र येवुन जोपर्यंत १२२ कामगारांना कामावर घेत नाही तो पर्यंत कंपनी चालु न करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामगारांवर होणा-या अन्यायाला न्याय देण्यासाठी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर व आमदार महेंद्र थोरवे यांनी मा.उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालय येथे तातडीने भेट घेवुन या कामगारांना न्याय देण्याबाबत विनंती केली.
सदर विनंतीनंतर मा.उद्योग मंत्री यांनी १५ सप्टेंबर रोजी संबंधीत विभागाचे अधिकारी व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये ह्युडाई मोबीज इंडिया या कंपनीने सर्व कामगार कामावर घेण्यात यावे तसेच कोणत्याही कामगाराची नोकरी जाऊ नये अशा सूचना कंपनी व्यवस्थापनाला केल्या आहेत. तसेच कंपनी व्यवस्थापनाला पुढील २ दिवसात निर्णय घेण्याचा अवधी दिलेला आहे. या बैठकीसाठी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, आमदार महेंद्र थोरवे, कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, कामगार उपायुक्त पवार साहेब, युनियन प्रतिनिधी रोहित विचारे, कंपनी व्यवस्थापन डेपो हेड काम सर, एच आर विशाल साळुंखे व महेश सोनवणे उपस्थित होते.
-----------------
मनसेमुळे मिळणार कामगारांना न्याय
उरण
कोरोनाच्या काळात जेएनपीटी परिसरातील गोडाऊन मधील सर्व्हे , लोकल लेबर , गार्ड यांना कामावरून काढणे , पगार कपात करून कामगारांनवर अन्याय होत असताना .महाराष्ट्र वखारमहामंडलातील कामगारांनी न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासद स्विकारले असून त्याच्या वर झालेल्या अन्याला वाचा फोडण्यासाठी कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस सचिन गोळे , सावंत , जिल्हाध्यक्ष अतुल भगत , यतीन देशमुख ,उपतालुकाध्यक्ष सत्यवान भगत , अमोल बोचरे , दिपक पाटील आणि कामगार प्रतिनिधी यांनी वखार महामंडळाचे अध्यक्ष ,कृष्णां लॉजिस्टिक चे इनचार्ज यांना धारेवर घेऊन येत्या दहा दिवसांत कामगाराच्या मागण्या आणि चार महिन्याचे पगार दिला नसून तो त्वरित देण्यात यावा अन्यथा कामगारांच्या जिवाशी खेळत असाल तर मात्र मनसे च्या पद्धतीने समजावे लागेल असे व्यवस्थापनाला ठणकवण्यात आले
0 टिप्पण्या