महापालिका आयुक्तांची ठाणे कोविड हाॅस्पीटलला अचानक भेट

महापालिका आयुक्तांची ठाणे कोविड हाॅस्पीटलला अचानक भेट : आयसीयू युनिटची केली तपासणी


ठाणे
महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी अचानक महापालिकेच्या ठाणे कोविड हाॅस्पीटलला भेट देवून रूग्णालय व्यवस्थापन तसेच वैद्यकीय व्यवस्थापनाचा तसेच  तेथील आयसीयू युनिटची तपासणी करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. ४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास  तेथील डाॅक्टर्स यांच्याशी बोलून वैद्यकीय व्यवस्थापन कशा पद्धतीने सुरू आहे तसेच उपआयुक्त (आरोग्य) विश्वनाथ केळकर यांच्याकडून सर्वसाधारण रूग्णालय व्यवस्थापनाची माहिती घेतली. यावेळी रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. माळगावकर उपस्थित होते.  महापालिका आयुक्तांनी रूग्णालयाच्या आयसीयू युनिटची तपासणी करून आयसीयू युनिटमध्ये किती रूग्ण उपचार घेत आहेत आणि किती बेडस् उपलब्ध आहेत याचा आढावा घेतला. तसेच या ठिकाणी उपचारासाठी येणा-या रूग्णांची कुठलीही गैरसोय झाल्याची तक्रार आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही महापालिका आयुक्तांनी यावेळी दिला. यावेळी अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे हेही उपस्थित होते.तब्बल ५०५२ इतक्या चाचण्या
कोविड १९ चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणा-या ठाणे महानगरपालिकेने  एका दिवसात (३ सप्टेंबर)  तब्बल ५०५२ इतक्या चाचण्या केल्या. दरम्यान चाचण्यांची संख्या वाढत असतानाही दुस-या बाजूला कोरोना रूग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात महापालिका प्रशासनाने यशस्वी ठरले आहे. कोरोना कोविड १९ चाचण्याची संख्या वाढविण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच सर्वांना निर्देश दिले होते. राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनीही सातत्याने चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर महापौर नरेश गणपत म्हस्केही याचा पाठपुरावा करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी यासंदर्भात कठोर प्रयत्न करून चाचण्यांची संख्या वाढविण्यात यश मिळविले आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरूवातीस तीन हजारांपेक्षा जास्त आणि त्यानंतर रोज चार हजार चाचण्या करण्याचे उदिष्ट त्यांनी निश्चित केले होते.  प्रत्येक प्रभाग समितीमध्ये ॲंटीजन टेस्टींग सेंटर सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार प्रत्येक प्रभागमध्ये टेस्टींग सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर काही सार्वजनिक ठिकाणीही ॲंटीजन टेस्टींग सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. ॲंटीजन चाचण्यांबरोबर महापालिका आयुक्तांनी आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे. 


 


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या