तर तुमचं आणि तुमच्या भावी पिढ्यांचं भविष्य अंधकारमय आहे.

तर तुमचं आणि तुमच्या भावी पिढ्यांचं भविष्य अंधकारमय आहे.
जीडीपी म्हणजे काय थोडक्यात


👉 समजा तुमच्या घरात शंभर माणसं आहेत आणि तुमच्या घराचं वार्षिक उत्पन्न पण शंभर रुपयेच आहे. तर तुमच्या घराचा GDP त्याला इंग्रजीतून Gross Domestic Product म्हणतात तो शंभर रुपये असतो. आता गोष्ट ईथंच थांबत नाही तर इथून चालु होते. घराचं वार्षिक उत्पन्न जर शंभर रुपये असेल, तर सरासरी दरडोई उत्पन्न (per capita income) एक रुपया होते. म्हणजे घरातल्या प्रत्येक माणसाला दरवर्षी एक रुपया खर्चायला मिळतो. म्हणजे समसमान वाटणी केली तर मिळायला हवा. पण तसं असतं का? तर नसतं.. 
👉 घराचा कारभारी शंभर रुपयातलं 70  रुपये स्वतःवर आणि स्वतःच्या मुलाबाळावर खर्च करतो. आणि राहीलेल्या 30  रुपयात बाकी 70 लोकांना  भागवावं लागतं. ईथुन सुरुवात होते गरीबीला आणि श्रीमंतीला. 
👉 आता भारताचा GDP 23 टक्यांनी कमी झाला म्हणजे काय तर, दरवर्षी सगळे मिळून 100 रुपये कमवतात  ते यावर्षी 77 रुपयेच मिळनार. म्हणजे घराचं उत्पन्न वाढन्या ऐवजी तेवीस रुपयांनी कमी झालं कारण कारभारी ढ निघाला आणि खर्च तर वाढतोच आहे.  


👉 पण कारभारी फक्त ढ आहे का?  तर नाही तो लबाड पण आहे.  सगळ्या घराचं उत्पन्न कमी झालं असताना कारभार्याचा मर्जीतल्या माणसाचं उत्पन्न एकदम वाढलेलं आहे, उदाहरणार्थ अंबानीचं ह्या वर्षातील उत्पन्न 7 हजार करोडनी वाढलं, म्हणजे देश मंदित असताना, सगळ्यांचं उत्पन्न कमी होत असताना कारभार्याच्या मर्जीतील माणसाचं उत्पन्न वाढतं म्हणजे कारभारी बाकी लोकांच्या तोंडातील घास काढुन त्याच्या स्वतःच्या मर्जीतील माणसाच्या खिशात भरतो.  
👉 म्हणजे घरात सगळ्यांनी मिळून कमावलेल्या 77 (ते पण गेल्या वर्षी पेक्षा कमी आहेत) रुपयांपैकी 50 रुपये फक्त कारभारी आणि त्याच्या मर्जीतल्या एकदोघांनी घेतले आणि  बाकी 90 लोकांना, "आता तुम्ही सत्तावीस  रुपयात भागवा म्हणुन सांगितलं, त्यात पुन्हा कारभारी लै अडाणी  आहे म्हणुन या बाकीच्या लोकांकडुनंच पैसे गोळा करतो आणि कुठं खर्च करतो कुणालाचा सांगत नाही. 
👉 म्हणजे GDP कमी होने म्हणजे कारभार्याच्या अडाणी आणि लबाडीची शिक्षा देशातील सगळ्या सामान्य लोकांना भोगावी लागनं. 


टिव्हीवाले तुम्हाला हे आणि असं सांगनार नाहीत, ते  तुम्हाला हिंदू - मुस्लिम, कंगणा,  सुशांत, पाकिस्तान, चीन अतिरेकी यात गुंतवुन ठेवतील आणि पुन्हा फुट पाडतील. तुम्हाला विकासाची स्वप्नं दाखवुन  वेड्यात काढलंय हे जर आजुन समजत नसेल तर तुमचं आणि तुमच्या भावी पिढ्यांचं भविष्य अंधकारमय आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA