Top Post Ad

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम ग्रामीण भागात प्रभावी

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम ग्रामीण भागात प्रभावी
मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या सूचना
रुग्ण बरे होण्याचा ग्रामीण भागाचा रिकव्हरी रेट ७९.८५ टक्के


ठाणे
राज्य सरकारची माझे कुटुंब माझी जबाबदारी ही महत्वाकांक्षी मोहीम ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी परिपूर्ण नियोजन करण्याची सूचना ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी यंत्रणेला दिली. शुक्रवारी  त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थिती संदर्भात चर्चा करण्यात आली. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वोतपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या ग्रामीण भागात १ हजार ८५० नागरिक कोरोना बाधित आहेत. आतापर्यंत १० हजार ८४२ जणांना कोरोनाची लागण होऊन त्यापैकी ८ हजार ६५८ जण बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा ग्रामीण भागाचा रिकव्हरी रेट ७९.८५ टक्के आहे.


या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन ) डी. वाय. जाधव यांच्यासह सर्व जिल्हास्तरीय खातेप्रमुख, तालुक्याचे गट विकास अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सोनवणे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचा आढावा घेतला. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे अभियान जिल्हा यशस्वी राबविण्यासाठी आरोग्य विभागांतर्गत नियोजन करण्यात येत आहे. अभियानाचा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यासाठी सोनवणे यांनी विविध सूचना केल्या. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंगे यांनी कोरोनाची सध्यस्थिती विषयी माहिती दिली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाला अटकाव करण्यासाठी आरोग्य विभागासह इतर अनेक विभागातील अधिकारी-कर्मचारी रात्रदिवस कार्यरत आहेत. ग्रामपंचायत विभागाच्या माध्यमातून गावातील कोरोना नियंत्रित करण्यासाठी कोरोना मुक्त हिरवा झेंडा ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. यामध्ये सलग २८ दिवस ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही अशा गावात हिरवा झेंडा लावला जात आहे. आतापर्यंत २०३ ग्रामपंचायत कोरोनामुक्त आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com