उरण पनवेल मधील समस्यांबाबत मंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक

उरण पनवेल मधील समस्यांबाबत मंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक


उरण 
उरण व पनवेल परिसरातील विविध समस्याबाबत उरण पनवेल महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली होती.  यावर मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकास मंत्री  एकनाथ शिंदे यांना  उरण पनवेल परिसरातील नागरी समस्यांबाबत बैठक घेण्याचे निर्देश दिले.  त्याप्रमाणे उरण पनवेल महाविकास आघाडीची  मंत्रालय येथे एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 18 सप्टेंबर रोजी बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, शेकाप आमदार बाळाराम पाटील, उरण पनवेल महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, शिरीष घरत शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख, प्रशांत पाटील प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस, आर.सी. घरत जिल्हाध्यक्ष पनवेल काँग्रेस, निलेश पाटिल, सुदाम पाटील, कार्याध्यक्ष पनवेल काँग्रेस,  संतोष पवार सचिव उरण सामाजिक संस्था तसेच सिडको एम. डी.  मुखर्जी व जे. एन. पी. टी प्रतिनिधी डॉ. सुदाम व  इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमुळे उरण व पनवेल परिसरातील विविध समस्या सुटण्यास मदत होईल असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केले..


यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली.
1.   सिडको प्रकल्पग्रस्तानी नैसर्गिक गरजेपोटी पोटी बांधलेली घरे आपल्या माध्यमांतून नियमित ह्यावी. 
2.   पंतप्रधान घरकुल आवास योजनेतील कामे स्थानिकांच्या अडचणी लक्षात घेता त्यांच्या शंकांचे निरसन झाल्या खेरीज आपण पंतप्रधान आवास योजनेस मान्यता देऊ नये व सदरील भूखंडावर असलेला विरोध पहाता आपण सदर भूखंडाच्या विकासाबाबतफेरविचार करावा. 
3.    उरण येथील 100 खाटांचे व पनवेल परिसरातील नागरिकांसाठी सिडको व जे. एन. पी. टी. कडून अद्यावत रुग्णालयाची उभारणी लवकरात लवकर करण्यात यावी.
 
4.      सद्या उरण पनवेल येथे कोरोना या माहामारीचे वाढते रुग्ण पहाता येथे आ. सी. यु. तसेच कोविड सेंटर बाबत चर्चा करण्यात आली. तसेच उरण व खारघर येथे कोविड साठी 100 बेडचे कोविड सेंटर त्वरित उभारावे असे मा. मंत्री महोदयानी आदेश सिडकोला दिले असता उद्या या सेंटरच्या जागेची पाहाणी करण्यासाठी सिडको जॉइंट एम.डी. श्री. शिंदे हे करणार आहेत.
5.   नैना प्रकल्पा बाबत सविस्तर विचार मंथन करण्याबाबत प्रकल्पग्रस्थांबरोबर सिडको एम डी यांनी बैठक लवकरात लवकर  घ्यावी आणि एम डी यांनी प्रकल्पग्रस्थांचे नुकसान होणार नाही हे पहावे.
6. पनवेल महापालिकेच्या कर्मचा-यांना कायमस्वरुपी कामावर घेण्यासाठी चर्चा करण्यात आली. याबाबत संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत मंत्री महोदयांनी सकारात्मक विचार विनिमय करून संबंधित अधिकाऱ्यांना  याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेंश दिले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या