१५ ऑगस्टनंतर सर्व आस्थापना सुरू ठेवण्याचा निर्णय
ठाणे
कोरोना कोविड 19 चे संकट अदयापही टळलेले नाही. ठाणे महापालिका चांगले काम करीत असून कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.शहरातील P1 व P2 नुसार ज्या आस्थापना सुरू होत्या त्या सर्व आस्थापना राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १५ ऑगस्टनंतर सकाळी 9.00 ते रात्रौ 7.00 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना कोविड 19 ची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याच्या पाश्वीभूमीवर शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या बैठक पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखली आयोजित करण्यात आली होती .या बैठकीस खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (1) गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाड, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले आदीसह विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या बैठकीत बोलताना पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी कोरोना कोविड 19 चे संकट अद्यापही टळलेले नाही. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे ही वस्तूस्थिती असली तरी प्रत्येकाचा जीव वाचवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यावेळी मॉल्स, मार्केटस्, जीम व स्वीमिंग पूल बाबत आढावा घेवून त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या. महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी लॉकडाऊनचा निर्णय हे नागरिकांच्या भल्यासाठीच घेतला होता असे सांगून लॉकडाऊन बंद केल्यानंतर सहकार्य करावे असे आवाहन केले. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी व्यापारी संघटनांनी सर्व आस्थापना सुरू करण्यबाबत केलेल्या विनंतीनंतर महापालिका प्रशासनांचे भूमिका स्पष्ट करून याबाबत आमची भूमिका सकारात्मक असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कोरोनाविषयी महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते डीजीठाणे प्रणालीव्दारे ऑनलाईन गणेश विर्सजन बुकिंग स्लॉट सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.
0 टिप्पण्या