ॲंटीजन टेस्टींगकरिता बाईक ॲम्ब्युलन्सचा वापर

आता बाईक ॲम्ब्युलन्सवरून होणार ॲंटीजन टेस्टींग :
चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी महापालिका आयुक्त डाॅ. शर्मा यांचा निर्णय     ठाणे
ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना कोविड १९ च्या चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या बाईक ॲंब्युलन्सचा वापर आता ॲंटीजन टेस्टींगसाठी करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत ॲंटीजन टेस्टीग सेंटर्स सुरू करण्यात आले आहेत. तथापि चाचण्यांची संख्या वाढावी या दृष्टीकोनातून महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या ॲम्ब्युलन्सचा विनियोग ॲंटीजन टेस्टींगसाठी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे.


आजमितीस आरोग्य विभागाकडे एकूण १७ बाईक ॲम्ब्युलन्स उपलब्ध असून या ॲम्ब्युलन्स प्रभागसमितीनिहाय वितरित करण्यात येणार आहेत. याबाबत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. मुरूडकर यांना या बाईक ॲम्ब्युलन्सचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बाईक ॲम्ब्युलन्सचा विनियोग कशा पद्धतीने करण्यात येणार आहे याचा निर्णय प्रभाग समिती स्तरावर घेण्यात येणार असून सदर बाईक ॲम्ब्युलन्स मोठी निवासी संकुले, मार्केटस आदी ठिकाणी या ॲम्ब्युलन्सचा वापर करण्यात येणार आहे.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या