ठाणे परिवहनच्या कंत्राटी वाहकांना पालिकेने कोव्हिडंच्या विविध कामासाठी हजर करून घेतले

परिवहन सदस्य अ‍ॅड. सुरेश कोलते यांच्या प्रयत्नामुळे १९५ पालिकेच्या कंत्राटी वाहकांना मिळाले काम

 


 

ठाणे

 

ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर  ४४० लोकं काम करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात बस सेवा बंद करण्यात आल्याने कंत्राटी वाहकांचे पूर्णतः काम बंद करण्यात आले आहे. या वाहकाना नियमित कामाचे पैसे मिळतात. बस बंद असल्याने या वाहकाना रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. उपासमारीची वेळ आली होती मात्र राष्ट्रीय श्रमिक संघ यूनियनचे सरचिटणीस, परिवहन सदस्य अ‍ॅड. सुरेश कोलते यांच्या प्रयत्नामुळे ठामपा परिवहन विभागाने तब्बल १९५ वाहकांना कोव्हिडंच्या विविध कामासाठी हजर करून घेतले आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या काही वाहकांना दिलासा मिळाला आहे. 

 

कोलते आणि संघटनेच्या पदाधिकारी यांनी पालिकेचे आयुक्त डॉ.बिपीन शर्मा, परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांच्या समोर याबाबत चर्चा केली. आयुक्तांनी या प्रकरणात सकारात्मकता दाखवत जोवर बस सुरू होत नाही तोवर कोव्हिडं सर्वेक्षणासाठी या वाहकाना काम देता येईल असे सांगत त्यांना सर्वेक्षणाचे काम दिले आहे. उर्वरित लोकांना देखील पालिकेच्या विविध विभागात आवश्यकतेनुसार बोलविण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.  कंत्राटी वाहकांना पालिकेने चार महिन्याचा पगार द्यावा यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तोवर या वाहकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू राहावं यासाठी पालिकेच्या माध्यमातून वाहकाच्या हाताला काम मिळावे यासाठी पाठपुरावा करण्यात येत असल्याचे कोलते यांनी सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या