वित्तीय क्षेत्रातील सुधारणेचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम
मुंबई
वित्तीय क्षेत्रात मजबूत सुधारणा झाल्याने भारतीय बाजार १७ ऑगस्ट रोजी सकारात्मक स्थितीत बंद झाला. निफ्टीने ०.६१% किंवा ६८.७० अंकांची वाढ घेतली व तो ११,२४७.१० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.४६% किंवा १७३.४४ अंकांनी वाढला व तो ३८,०५०.७८ अंकांवर स्थिरावला. भारतीय रुपया: सकारात्मक देशांतर्गत इक्विटी बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आजच्या व्यापारी सत्रात फ्लॅट स्थितीत ७४.८८ रुपयांवर बंद झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर आजच्या सत्रात पिवळ्या धातूचा व्यापार सकारात्मक स्थितीत बंद झाला. ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी गोल्ड फ्यूचर्स १० ग्राम सोन्यासाठी ०.१२% च्या वृद्धीसह ५२,२९० रुपयांवर बंद झाला.
जागतिक बाजारात युरोपीय आणि आशियाई बाजारात कोव्हिड-१९ चे रुग्ण आणि भू-राजकीय मुद्द्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे संमिश्र ट्रेंड दिसून आला. नॅसडॅकमध्ये ०.२१%, एफटीएसई एमआयबीमध्ये ०.३०%ची घसरण दिसून आली. तर निक्केई २२५ मध्ये ०.८३% ची घट दिसून आली. दुसरीकडे एफटीएसई १०० च्या शेअर्समध्ये ०.५७% आणि हँगसेंगमध्ये ०.६५% ची वृद्धी झाली. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात एनटीपीसी (७.४७%), आयशर मोटर्स (४.७९%), झी एंटरटेनमेंट (४.७१%), हिंडाल्को (४.४६%) आणि बजाज ऑट (४.३३%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर दुसरीकडे एसबीआय (१.५५%), भारती एअरटेल (१.४७%), बीपीसीएल (१.२८%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.९३%) आणि टाटा मोटर्स (०.७२%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. फार्मा क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या रंगात स्थिरावले. बीएसई मिडकॅप ०.४१% नी वाढला तर बीएसई स्मॉलकॅप ०.८४% नी वधारला.
ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये २.०७% ची वृद्धी झाली आणि त्यांनी ३,८७९.९५ रुपयांवर व्यापार केला. तत्पूर्वी कंपनीने प्रति शेअर ८३ रुपयांच्या अंतरिम लाभांशाची घोषणा केली.
सन टीव्ही नेटवर्क लिमिटेडच्या स्टॉकमध्ये ०.०६% ची वृद्धी झाली व ग्लोबल रिसर्च फर्म सीएलएसएने स्टॉकवर खरेदी कायम ठेवल्यानंतर त्यांनी ४२४.४० रुपयांवर व्यापार केला. कंपनीच्या पहिल्या तिमाहीत उत्पन्न सकारात्मक झाले. त्यानंतर सबक्रिप्शन रिव्हेन्यूमध्ये १८% ची वाढ दिसून आली.
एनटीपीसी लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीत ७.४७% ची वृद्धी झाली आणि कंपनीची जूनमधील कमाई शेअर मार्केटच्या अंदाजापेक्षा जास्त झाली. परिणामी शेअर्सनी ९५.०० रुपयांवर व्यापार केला. कंपनीच्या नफ्यात ६% ची घट झाली तर ऑपरेशन्समधील महसुलात २.५७% ची घसरण झाली.
ग्लेनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेडने नफ्यात दुप्पट वृद्धीची घोषणा केली. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये १.४८% ची वाढ झाली व त्या ४८२.७५ रुपयांवर व्यापार केला. २०२१ या वित्त वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २५४.०४ कोटी रुपये झाला. तर कंपनीचा एकत्रित महसूल २,३४४.७८ कोटी रुपये झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आरआयएल शेअर्समध्ये ०.९३% ची घसरण नोंदवली गेली व त्यांनी २,०९४.०५ रुपयांवर व्यापार केला. दरम्यान सुप्रीम कोर्टाने एजीआरच्या वसूलीसाठी (तत्काळ अॅग्रीमेंट) च्या मागणीसंबंधी याचिका रद्द केली.
0 टिप्पण्या