मुलनिवासीवादाला विरोध कां

मुलनिवासीवादाला विरोध कां


         प्रकाश तक्षशील    
           
जे लोक मुलनिवासीवाद ह्या थिअरीचा प्रचार प्रसार 'युरेशियन थिअरी (आर्यन सिध्दांत) च्या आधारे करतात,  अश्या किती जनांना माहीत आहे युरेशियन थिअरीचे जनक कोण ? ह्या थिअरी उगम होन्याचे कारण काय ?
हा सिध्दांत डॉ. बोपच्या दार्शनिक विचारावर आधारित आहे, जे त्यांनी १८३५ मध्ये आपले युगांतकारी पुस्तक कम्पेरेटिव ग्रामर  मध्ये प्रगट केले. युरोपियन लोकं स्वत:ला इतरापेक्षा श्रेष्ठ समजत. भाषेवरुनच ह्या सिध्दांताची निर्मिती झाली. बामसेफ ही संघटना ब्राह्मणांचा तिव्र स्वरुपात विरोध करते. त्यांच्या कोणत्याही वक्तव्यावर सहज विश्वासच करत नाही. तसे ही बरोबरच आहे, ब्राह्मण हे कुठलेही काम स्वार्थाविना करतच नाही. आपला स्वार्थ साध्य करण्यासाठी ते इतिहासाची  पायमल्ली करु शकतात, हे आता लपुन राहीलेले नाही.


बामसेफची चळवळच ही ब्राह्मण द्वेशावर आधारलेली आहे. द्वेशातुन निर्माण केलेल्या ह्या संघटनामध्ये अग्रणी भुमिका निभावण्याचे काम बामसेफ करीत आहे. ह्या द्वेश भावनेला कॅश करण्याचे काम बामसेफची सहयोगी संघटना मुलनिवासी करीत आहे. ह्या संघटनेतुन ते ब्राह्मणांचा इतका तिव्र द्वेश करीत असतांना, ते ब्राह्मणद्वारा लिखीत साहित्यावर कसा काय विश्वास ठेउ शकतात ? त्यांच्या लेखणाचे समर्थन ते कसे काय करु शकतात ? याचा अर्थ साफ आहे की, बामसेफ एक स्वार्थी व आपलेपणा जोपासनारी संघटना आहे. तिने निर्माण केलेल्या मुलनिवासी संकल्पनेला जिवंत ठेवण्यासाठी व तिच्याद्वारे आपली द्वेशी चळवळ पुढे चालु ठेवण्यासाठी, ह्या मुलनिवासी सिद्धांताच्या समर्थनार्थ ज्यांनी काही लिहले, त्यांना ह्या संघटनेने स्विकारले. मग ते ब्राह्मणही असो ?


हेच कारण आहे, त्यांना टिळक, नेहरु व दिक्षीत सारखे कडवे ब्राह्मण देखील गोड वाटायला लागतात. परंतु न्याय प्रस्थापनेसाठी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घालणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे जगतविख्यात विद्वान त्यांना दिसत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ह्या मुलनिवासी संदर्भात केलेले संशोधन त्यांना दिसत नाही. कारण त्यांचे संशोधन हे त्यांच्या मुलनिवासी संकल्पनेच्या चिंधाड्या उडविणारे आहे. बाबासाहेबांनी ह्या संबंधात एक संशोधनपर ग्रंथ लिहीला, परंतु ह्या मुलनिवासियांना तेा दिसत नाही. तर 'आर्टिक्ट होम इन वेदाज' , 'डिस्कव्हरी ऑफ ईंडिया' सारखे ब्राह्मण द्वारा लिखीत पुस्तके दिसतात, ज्या मध्ये ह्याच्या संशोधनाचा जराही संबंध नाही.


आपल्या थिअरीच्या समर्थनासाठी ज्या टिळक, नेहरुचा व त्यांच्या पुस्तकाचा उल्लेख करतात, त्याच लेखकाचा व पुस्तकाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कसा समाचार घेतला, हे त्यांना दिसत नाही.  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या "हू वेअर द शूद्राज"  ह्या संशोधनपर ग्रंथामध्येच ह्या तथाकथीत ब्राह्मणी लेखकांचा सिध्दांत कसा बिन बुडाचा आहे, हे तर्क व साक्षसहीत दाखवुन दिले. बाबासाहेब ठोस आधाराशिवाय, तर्काशिवाय कोणतीही गोष्ट सांगत नाही किंवा आपला मुद्दा मांडत नाही. बाबासाहेबांच्या ह्या सर्वात्तम गुणापासुन आज कुणीही अपरिचीत नाही.  पुर्ण तर्कासहीत ह्या ब्राह्मणांच्या लिखाणाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी खंडण करुन ही, हे मुलनिवासी तथा बामसेफी आपल्या विचारधारेच्या प्रचारासाठी बाबासाहेबांच्या ह्या सिध्दांताला दुर्लक्षित करतात.  यावरुनच ह्या बामसेफी, मुलनिवासी संघटनेचा हेतु जनतेसमोर संशयास्पद म्हणुन समोर येतो. हे लोकं द्वेशाने इतके बरबटले आहे की, यांना आपल्या द्वेशासमोर बाबासाहेबांचे संशोधन व त्यांनी घेतलेल्या निर्णय क्षमतेवर देखील हे लोक संशय घ्यायला मागे पुढे पाहत नाही. बाबासाहेबांनी केलेल्या दुसऱ्या पत्नीला 'विषकन्या' ही त्यांनी दिलेली ओळख त्यांच्या हेतुबद्दल संशय घेण्यास पर्याप्त आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीच जर ह्या मुलनिवासी सिद्धांताला स्विकारले नाही, तर मग आम्ही तर त्यांची लेकरं. 


'मुलनिवासीवाद' हा सिध्दांत ब्राह्मणाविरुध्द असुनही, ते यावर हस्तक्षेप कां घेत नाही ?
 हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु कुणीही ह्या प्रश्नाला गंभीरतेने घेत नाही. बामसेफी ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत नाही. ह्या संघटनेचे म्होरके पण आपल्या भक्ताला सदर प्रश्नापासुन दुर ठेवतात. हे लोकं बाबासाहेबांचे ह्या संदर्भात काय मत होते, हे जाणुन घेन्याऐवजी, ते मुलनिवासीवर लिहलेलेल्या मुलनिवासी लेखकाचे पुस्तक वाचण्यासाठी आपल्या भक्तांना प्रोत्साहीत करतात. म्हणुनच हे लोक सदर प्रश्नाच्या उत्तरापासुन वंचीत राहतात व आपले मुलनिवासी लेखकांनी मांडलेले मत अंतीम समजतात.


सदर सिध्दांत हा ब्राह्मणाविरुध्द आहे, असा प्रचार करणारे ते स्वत:च असतात. ब्राह्मण विदेशी आहे, हा सिध्दांत काही ब्राह्मणांनी रचलेला नाही आहे. ब्राह्मण कोणतीही गोष्ट अकारण करत नसतात. जर त्यांनी कोणत्या मुद्द्यावर मौन पाळले असेल, तर त्या मागे त्यांचे काहीतरी गूढ दडलेले असनार. आपणास विदेशी ठरविण्याच्या मुद्द्यावर ब्राह्मण मौन कां आहेत, याचे उत्तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या संशोधनपर ग्रंथ 'हू वेअर द शूद्राज' मध्ये लिहतात, "आपले श्रेष्ठत्त्व अबाधीत ठेवण्याच्या लालसेपाई, ब्राह्मणांनी ह्या सिध्दांताचा विरोध केला नाही. कारण की, ईंडो-जर्मन भाषा बोलणारे युरोपियन हे सर्वश्रेष्ठ आहेत, अशी तिथे मान्यता होती. व ह्याच भाषेला आर्यभाषा म्हटल्या गेले. आर्य हा शब्द वैदिक भाषेमध्ये आढळतो.  ब्राह्मणांसाठी ही एक आयती संधी उपलब्ध झाली, आपले श्रेष्ठत्व जाहीर करण्यासाठी." परंतु हे काम त्यांना करण्याची गरजच नाही पडली. त्यांचे हे काम बामसेफ आणि त्याच्या सहयोगी संघटनाच करत आहेत. म्हणजे ब्राह्मणाला सर्वश्रेष्ठ घोषीत करन्याचे काम हीच बामसेफी/मुलनिवासी संघटना करीत आहे.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, आर्य सिध्दांत हा फक्त अनुमानावर आधारित आहे.
'ब्राह्मण विदेशी' ह्या आपल्या द्वेशमुलक शब्दाच्या समर्थनार्थ त्यांनी दिक्षीत नावाच्या ब्राह्मणाद्वारा बामशाद कृत 2001 च्या डिएनए चा संदर्भ देतात. परंतु ते 2005 चा ज्ञानेश्वर पांडे द्वारा डॉ.प्रो.किवीसील्ड अधिकृत उच्च पैमानेपर केलेला डिएनए संशोधन लोकांपासुन लपवुन ठेवतात. आताच काही दिवसापुर्वी पुरातत्त्व विभाग पुणे चे शिंदे यांनी देश विदेशातील वेगवेगळ्या विद्यापिठामधुन वेगवेगळ्या शास्ञज्ञाद्वारे जो डिएनए रिपोर्ट सादर केला, त्या मध्ये त्यांनी 'आर्य भारतात बाहेरुन आले' ह्या सिद्धांताला खोटे सिध्द केले.


फक्त आपण उभ्या केलेल्या संघटनेच्या माध्यमातुन ब्राह्मणांऩा टारगेट करत आपले राजकारण चालु ठेवावे, निव्वळ आपल्या ह्या हव्यासापाई ते सत्याला स्विकारण्यास तयार नाही. आता ते आपल्या ह्या विरोधासाठी 'डिएनए चाचणी' ला समोर करत आहे. तर मग 2001 पुर्वी ते ह्या 'आर्यण थिअरी' चे समर्थन कशाच्या आधारे करत होते ? म्हणजे तेव्हा त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संशोधनापेक्षा आपल्या विचारधारेला पोषक अश्या कट्टर ब्राह्मणांच्या तर्कहिन दोन चार ओळी प्रमाणित वाटाव्या ? बाबासाहेब व त्यांच्या संशोधनासमोर त्या गांधीचे एक वाक्य साक्ष वाटावे ?
ब्राह्मणाला शिव्या द्यायचे व त्याच ब्राह्मणांच्या लिखाणाला सत्य मानुन साक्ष म्हणुन प्रस्तुत करने ? 
संविधानाच्या रक्षणाच्या बाता मारने आणि त्याच संविधानामधील 'कलम 15' चे जाहीरपने उल्लंघन करने, ही बामसेफ ची खेळी लोकांपासुन लपुन राहीलेली नाही.


प्रकाश तक्षशील 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA