रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेचे लवकरच राजकीय पक्षात रुपांतररमाबाई ब्रिगेड महिला संघटना लवकरच बलाढ्य राजकीय पक्ष होणार

ठाणे, मुंबई, सांगली, पुणे, नाशिक, औरंगाबाद, पालघर, चिपळूण मध्ये मारली यशस्वी मजल

 

शहापूर 

रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेचे जाळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पसरले आहे. संस्थेने ठाणे, मुंबई, सांगली, पुणे, नाशिक, औरंगाबाद, पालघर, चिपळूण या जिल्ह्यांमध्ये यशस्वी मजल मारत आपले अस्तित्व कायम केले आहे. त्यामुळे रमाबाई ब्रिगेड महिला संघटना लवकरच बलाढ्य राजकीय पक्षात रुपांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती भगवान गायकवाड यांनी दिली. संघटनेची महाराष्ट्र राज्याची महत्वपूर्ण बैठक २० ऑगस्ट रोजी  शहापूर येथे

घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

 

या बैठकीत संघटनेच्या कार्यकर्त्यांना जनसेवा करत असताना कोणते महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या व कार्याची पद्धत स्वबळावर जनसेवा कशी केली जाते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी काही युवा मुलांनी या संघटनेत सहभागी होण्यासाठी इच्छा दर्शवली असता मुंबई अध्यक्षपदी पुरुष गटाकरिता संदेश तुकाराम होडे यांची निवड करण्यात आली. तसेच मुंबई महासचिव पदी पुरुष गटाकरिता राकेश आरोंडेकर यांची निवड करण्यात आली

यावेळी ठाणे जिल्ह्यातील शेकडो युवा मुलांनी पुरुषांनी या संघटनेत प्रवेश केला आहे. याप्रसंगी रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती भगवान गायकवाड, संघटनेचे प्रमुख सत्यकाम पवार, महासचिव मोहिनी चव्हाण, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षा  नीता बबन पाटील, उपाध्यक्षा ठाणे जिल्हा ग्रामीण ज्योती भूषण गायकवाड, शहापूर तालुका अध्यक्षा  ज्योती कृष्णा भानुशाली,  पुष्पा ताजणे, कुलसुम बर्डी, नसीम बर्डी, शबनम बेग व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

  
 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या