Top Post Ad

नवीन शिक्षण प्रणाली... बहुजनांच्या अ-हिताची

नवीन शिक्षण प्रणाली... बहुजनांच्या अ-हिताची


सरकारने नव्याने आणलेली National Education Policy.या थेअरी नुसार भारतात दोन Nation अभिप्रेत आहेत 1)Serving Nation 2) Governing Nation .या NEPनुसार  विद्यापीठांना तीन कॅटॅगिरी मध्ये विभाजित करण्यात आले आहे १) कौशल्यावर आधारीत पदवी व पदविका देणारे विद्यापीठ २) सर्व शाखांमध्ये Graduate & Postgraduate डिग्री देण्यासाठी क्लासेस व परीक्षा घेणारे विद्यापीठ ३) संशोधनासाठी वाहिलेले विद्यापीठ ज्यामध्ये परदेशी विद्यापीठे (जगातिल पहिले शंभर )भारतिय विद्यापीठांसोबत टायअप करून आपल्या शाखा चालवतील किंवा स्वतंन्त्रपणे चालवतील .व त्यामध्ये फी ही जागतिक स्तरानुसार असतिल व हे विद्यापीठे पूर्णत: खाजगी असतिल व त्यांवर सरकारचे काहीही नियम वा बंधन लागू होणार नाहीत . ही संपूर्ण थेअरी आरएसएसच्या गोळवलकर गुरूजींच्या Two Nation Theory नुसार बनवण्यात आली आहे 


  या देशांतील जो कष्टकरी वर्ग आहे ज्यात ओ बी सी बहुसंख्येने आहेत त्याची मुल ही आठव्या वर्गापासून जो कौशल्य आधारीत अभ्यासक्रम आहे तो जास्तीत जास्त स्विकारतिल कारण धोब्याचा ,नाव्ह्याचा ,सुताराचा ,सोनाराचा , लोहाराचा ,तेल्याचा ,माळ्याचा ,साळ्याचा ,कुणब्यांचा जो जो व्यवसाय आहे त्याचे त्याचे कौसल्यावर आधारीत अभ्यासक्रम पहिल्या विद्यापीठांत शिकविल्या जातील व वरिल जातींचा स्वत:चा छोटा मोठा त्यांच्या जातींशी संबंधित व्यवसाय असल्यामुळे त्या मुलांचे पालक त्या व्यवसायाशी संबंधित कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम स्विकारण्याची सक्ती करतील कारण त्याच्या व्यवसायात त्याला मदत होईल म्हणून .ज्या खालच्या जाती आहेत त्याच्या साठीही क्लीनींग ,हाऊस किपींग सारखे अभ्यासक्रम असतिल .


   साधारण पाच ते दहा टक्के OBC ,SC ,ST ,Minority चे विद्यार्थी दुसऱ्या प्रकारच्या विद्यापीठांत प्रवेश घेवून graduate & postgraduate होतील व competitive exam through क्लर्क पासून तर I A S पर्यंत नोकऱ्या मिळवतील .
 तिसऱ्या प्रकारच्या अत्यंत महागड्या व आरक्षण विरहीत विद्यापीठांत (पहिल्या दोन प्रकारच्या विद्यापीठांत आरक्षणाची शक्यता आहे ) OBC,SC,NT ,minority हा क्वचितच प्रवेश घेईल पण त्याला harrash करण्यात येईल व  पी एच डी मिळणार नाही . या विद्यापीठांत सर्व उच्चवर्णीय शिकून या देशांतील विविध विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त होतील . तेच प्रत्येक विषयाचे तज्ञ म्हणून या देशाच्या प्रत्येक निती निर्धारण प्रक्रियेचे प्रमुख असतिल .सारे शासन प्रशासन त्याच्या शंभर टक्के कब्जात असेल व त्यात ब्राम्हण नव्वद टक्के तर कुठे शंभर टक्के असतिल ओबीसी ,व इतर खालच्या जातींचा दूरपर्यंत मागमूसही नसेल .सारे सेक्रटरी व इतर उच्च पदस्थ अधिकारी हे याच विद्यापीठातून भरल्या जातील


कारण सध्या १५४ सेक्रटरी हे UPSC द्वारे आलेले नसून मोदी सरकारने त्यांना तज्ञ म्हणून भरलेले आहेत जे विविध corporate मध्ये कामाला होते व जे सरकारशी लाॅयल आहेत . याच पद्धतीने I AS ला कन्ट्रोल करण्यासाठी या विद्यापीठातिल उच्चवर्णीय व्यक्ती नियुक्त होइल व अशा पद्धतीने पहिल्या दोन विद्यापीठातून तयार होणारे OBC,SC,ST ,DTNT ,minority हे सेवा देणारे serving Nation म्हणून जगतिल व ब्राम्हण व इतर उच्चवर्णीय हे Governing Nation म्हणून जगतिल व गोळवलकर गुरूजींची Two Nation Theory ही अस्तित्वात येईल .व पूढे जावून CAA NRC च्या माध्यमातून Serving Nation चा मताधिकार देखिल संपविण्यात येईल . 


                    :राहुल वानखेडे :
                     उमेदवार पदविधर मतदार संघ नागपूर



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com