भोपाळ दुर्घटना, DOW आणि बाळासाहेब आंबेडकर
भजन-कीर्तनातं वाजविले जाणारे वाद्य ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या हातात पाहून अनेक लोक बाळासाहेबांवर हसतात पण या फोटोमागील सत्य कोणीजाणून घ्यायचा प्रयत्न करीत नाही.
Union Carbide Corporation(UCC) ह्या कंपनीच्या भोपाळ येथील कीटकनाशक बनविण्याच्या कारखान्यात वायू गळती होऊन ८०००-१०००० हजार लोकांचा मृत्यू झाला होता. हजारोंना अपंगत्व आले होते. काहींच्या परिवारात आजही अपंगत्व असलेले अपत्य जन्मास येत आहेत. हे सर्व UCC या कंपनी मुळे झाले होते. या कंपनीच्या म्होरक्यास तत्कालीन कॉंग्रेस सरकारने सुरक्षित भारताबाहेर पाठविले होते.
हि UCC कंपनी Dow Chemical Company या कंपनीने विकत घेतली आहे.
DOW या कंपनी बद्दल सांगायचे झाले तर Agent Orange नावाचे रसायन बनविणारी हि कंपनी. Agent Orange या रसायनाचा उपयोग अमेरिकेच्या लष्कराने वियतनाम मधे केला होता.या रसायनास वियतनाम मधील जमिनी बंजर (नापिकी ) करण्यासाठी फवारण्यात येत होते. या रसायनामुळे आजही वियतनाम मधील हजारो एकर जमिनीवर काहीही पिकत नाही. वियतनाम मधील लाखो नागरिक या रसायनातील विषामुळे मारल्या गेले होते, हजारो शारीरिक दुर्बल बाळांचा जन्म झाला होता. आजही शारीरिक दुर्बल त्या भागात जन्मास येत आहेत. अमेरिकेतील ज्या सैनिकांनि Agent Orange ची फवारणी केली होती ते सुद्धा मृत्तुमुखी पडले होते त्यांच्या घरातही शारीरिक दुर्बलता असलेल्या बाळांचा जन्म झाला होता.
या DOW कंपनीने महाराष्ट्रात पुण्याजवळ लाखोंचे जीव घेणारा नवा कारखाना सुरु करण्याचा प्रयत्न केला होता तेंव्हा ऍड.बाळासाहेब आंबेडकर हे एकटे राजकारणी होते ज्यांनी DOW विरोधी लढ्यात वारकरी मंडळी सोबत लढा दिला होता आणि DOW चा लाखो लोकांचे जीव धोक्यात टाकणारा कीटकनाशक कारखाना उभा करण्याचा प्रयत्न हाणून पाडला होता. Dow विरोधात भारिप आणि वारकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने लाखोंचा मोर्चा नागपूर विधानभवनावर काढण्यात आला होता, वाद्य वाजवतांनाचा हा फोटो त्याच मोर्चातील आहे.
Dow प्रमाणेच बाळासाहेबांनी एनरॉन या कंपनी विरोधातही लढा दिला होता. ENRON या मल्टिनँशनल कंपनि कडुन काँग्रेस, भाजप,सेना,राष्ट्रवादी या सर्वच पक्षांनि पैसे खाऊन, दाभोळ येथे महाराष्ट्राला आर्थिक द्रुष्ट्या लुटुन खाणारा विज प्रकल्प तयार करायचि परवानगी Enron या कंपनीला दिलि होति. जनतेला लुटणाऱ्या या प्रकल्पाला शेवटपर्यंत विरोध करणारा एकच नेता होता तो म्हणजे अॅड.बाळासाहेब आंबेडकर.. बाळासाहेबांनि Enron प्रकरणि कुठलीही तडजोड न करता जनतेचि बाजु लावुन धरलि होति. संसदेतहि एन्रॉन प्रश्नावर बाळासाहेबांनी सरकारला सळो की पळो करून सोडले होते. एन्रॉनचे सत्य जनतेमध्ये पोहचावे म्हणून बाळासाहेबांनी एन्रॉन प्रकल्पावर लिहिलेली एक पुस्तिकाही प्रकाशीत केली होती.
Dow, Enron ,Gatt करार अश्या महत्वाच्या आर्थिक प्रश्नावर आणि जातीयतेच्या प्रश्नावर बाळासाहेबांनी मल्टिनॅशनल कंपन्यांना, आरएसएसला, काँगेसला, तत्कालीन सरकारांना जेरीस आणले होते. यावरन चिडलेल्या या सर्व प्रस्थापितांनी बाळासाहेबांना राजकारणात एकटे पाडले, त्यांचा पक्ष फोडण्यात आला, आमदार पळवण्यात आले , त्यांच्या विरोधात बुजगावण्यांना रसद पुरविण्यात आली आणि वैयक्तिक स्वरूपाचा अत्यंत खालच्या पातळीवरही अपप्रचार करण्यात आला पण बाळासाहेबांनी आपला आंबेडकरी बाणा सोडला नाही आणि जनतेची बाजू घेऊन लढतच राहिले. या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधात, भांडवलशहांच्या विरोधात कोणत्याही देशातील राजकारणी मंडळी जात नाही पण अॅड.बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या विरोधात लढले आणि जिंकलेही....
भोपाळ मधील घटनेची भयानकता पाहण्यासाठी
Bhopal Disaster Victims Images
आणि Agent Orange ची भयानकता पाहण्यासाठी
Agent Orange Victims Images
असे गूगलवर सर्च करावे.
सुमित वासनिक..
0 टिप्पण्या