Top Post Ad

"आदिवासी फाऊंडेशन" संस्थेच्या वतीने वाचनालयाकरिता मांडणी भेट

   

"आदिवासी फाऊंडेशन" संस्थेच्या वतीने वाचनालयाकरिता मांडणी भेट

 


 

विक्रमगड

समाजाची शैक्षणिक प्रगती व्हावी, समाज शैक्षणिक दृष्टया प्रगत व्हावा, तसेच युवकांनी स्पर्धा परीक्षा मध्ये यश मिळवावे, याकरिता वाचन हे एकमेव शस्त्र आहे. २८ ऑगस्ट रोजी रोजी  विक्रमगड ,खोस्ते गाव येथील  युवा आदिवासी एकता मित्र मंडळ आणि गावकरी यांच्या प्रयत्नाने सुरु केलेल्या वाचनालयासाठी  "आदिवासी फाऊंडेशन" संस्थेच्या वतिने विविध अभ्यासक्रमाची आणि माहितीपर पुस्तके आणि पुस्तके ठेवण्यासाठी मांडणी(रॅक) भेट स्वरूपात देऊन त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या.  ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित साधून गावातील युवकांनी प्रगतिशील असा उपक्रम हाती घेऊन समाज हॉल मध्ये  बिरसा मुंडा  वाचनालयाची स्थापना केली. 

   संस्थेचे अध्यक्ष- भरत भोये, उपाध्यक्ष-प्रकाश पाटकर, सचिव-गुरुनाथ सहारे, जयेश गावित सर, महेश भोये सर, सुनिल काकड सर, भूषण महाले, अनिल दादोड तसेच फाऊंडेशन मित्र परिवार गुरुनाथ आघाणे, भागेश भुसारा, अजय सहारे, कृष्णा सहारे आणि ग्रामपंचयात हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते भास्कर भोये, नितेश भोये(ग्रामपंचायत सदस्य), मनोज गायकवाड सर,विजय भोये(सैनिक), दिलीप गावित गुरुजी खोस्ते जि. प.शाळा. आणि गावातील तरुण युवा वर्ग तर आदी  उपस्थित होते.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com