राज्यात आतापर्यंत 13716 पोलिसांना कोरोनाची बाधा

राज्यात आतापर्यंत 13716 पोलिसांना कोरोनाची बाधा


मुंबई


 राज्यात सध्या सर्वत्र उत्सवाचे दिवस सुरु आहेत. गणेशोत्सव सुरु असल्यामुळे बंदोबस्ताचा ताणही पोलिस यंत्रणेवर आहे. मात्र गेल्या 24 तासात कोरोनामुळे एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, एकूण 120 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळत आहे.  कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस खात्यात आतापर्यंत 13716 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये 1456 पोलीस अधिकारी तर 12260 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 2528 पोलीस कर्मचारी हे कोरोनाग्रस्त म्हणून उपचार घेत असून, यात 331 पोलीस अधिकारी तर 2197 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 11049 पोलीस हे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून, यामध्ये 1110 पोलीस अधिकारी तर 9939 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्तव्य बजावत असताना आतापर्यंत राज्यात 139 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 15 पोलीस अधिकारी तसेच 124 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


आतापर्यंत कलम 188 नुसार महाराष्ट्र पोलिसांनी 233423 गुन्हे दाखल केले असून राज्यभरात क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 829 जणांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. राज्यभरात 336 प्रकरणात पोलिसांवर हल्ला झाला असून, याप्रकरणी 891 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. राज्यात अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आलेली असून, आतापर्यंत 33 हजार 793 आरोपींना अनधिकृत वाहतूक प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत पोलिसांनी 95994 वाहने जप्त केली असून, तब्बल 22 कोटी 22 लाख 49 हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये 89 पोलीस जखमी झाले आहेत. वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 69 घटना घडलेल्या आहेत .टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या