Top Post Ad

"अशोक चव्हाण हटाव, मराठा आरक्षण बचाव" - मराठा संघटना पुन्हा आक्रमक

"अशोक चव्हाण हटाव, मराठा आरक्षण बचाव" - मराठा संघटना पुन्हा आक्रमकमुंबई


राज्याच्या विविध भागात मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीबाबत जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. मुंबईच्या आझाद मैदान येथे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्याकडून जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. अशोक चव्हाणांना उपसमितीवरुन हटवा, मराठा आरक्षण टिकवा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात आंदोलनास परवानगी नाकारल्याने रस्त्यावरच हे आंदोलन करण्यात आलं. इतकेच नव्हे तर नाशिक, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि बीडमध्ये जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. अशोक चव्हाणांना उपसमितीवरुन हटवण्याची प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.राज्यात महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाविषयी निष्काळजीपणा दाखवत आहे. सारथी बैठक सोडली तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, आणि त्याला सर्वस्वी अशोक चव्हाण जबाबदार आहेत. त्यांच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असलेले आरक्षण जाते कि काय अशी भीती निर्माण झाली आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मराठा समन्वय समितीकडून पुणे येथे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर मंत्रिमंडळ बैठकीत आत्मबलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याबाबत निर्णय झाला मात्र त्याची अमलबजावणी अद्याप सुरु झालेली नाही. यासोबतच राज्यातील आमदार, खासदारांना या मागण्यांबाबत निवेदने देणे सुरु आहे. आ विनायक मेटे यांनी सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले होते


मराठा समाज्याच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्या, या सह 2015 मध्ये SEBC मधून नोकरीसाठी मराठा तरुणांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यात उत्तीर्ण झालेल्या तरुणांना नोकरीचे आदेशही काढण्यात आले. पण प्रत्यक्षात मात्र या तरुणांना रुजू करून घेण्यात आले नाही. या सर्व तरुणांना नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी चाळीसगाव येथील मराठा समन्वय समितीच्या वतीने समन्वयक लक्ष्मण शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जागरण गोंधळ करून आंदोलन करण्यात आले. औरंगाबादेतील क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी  आंदोलन केले.  विनापरवानगी आंदोलन केल्याने पोलिसांनी 30 हून अधिक जणांना ताब्यात घेतले, त्यांना क्रांती चौक पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणाबाजीही केली.


नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. नाशिकच्या सीबीएस चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं. तर पिंपरीत झोपी गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षणाबाबत सरकारने झोपेचं सोंग घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पिंपरी चिंचवडच्या डांगे चौकातही मराठा समन्वय समितीकडून हे आंदोलन करण्यात आलं. सोलापुरातही मराठा समन्वय समितीच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीराजे चौकात हे आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं. बीडमध्येही चराटा फाटा याठिकाणी मराठा समाजाच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com