बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा स्मरणपत्र

मागणीपत्रावर कोणती कारवाई झाली.... बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र


ठाणे 


सर्व सामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच दलितांवरील हल्ले-अत्याचार यांच्या निषेधार्थ २५ जुन रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर   मूक प्रदर्शन आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. मात्र महिनाभराचा कालावधी होऊन गेला तरी यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होतांना दिसत नाही. परिणामी पक्षाच्या वतीने आज २४ जुलै रोजी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र देण्यात आले. आणि महिनाभरापूर्वी करण्यात आलेल्या मागण्यांवर काय कारवाई केली याची विचारणा करण्यात आले. प्रा चंद्रभान आझाद यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन देण्यात आले. ठाणे अध्यक्ष प्रभाकर जाधव, हेमंत तायडे, विलास गायकवाड, शाहीर अशोक कांबळे आदी कार्येकर्ते यावेळी उपस्थित होते.


२०२० कोरोना लॉकडाऊनमुळे आर्थिकदृष्टया उध्वस्त गरजू परिवारास केंद्र सरकारने पंतप्रधान केअर फंडातून अथवा विशेष पॅकेज अंतर्गत आगामी सलग दर तीन महिने पाच हजाराचे अर्थसहाय्य करावे. केंद्र सरकारने देशातील सर्व माजी आमदार /खासदार यांना क्रेमीलियरचे धोरण लावून एक कोटी पेक्षा जास्त संपत्तीधारक माजी आमदार खाजदारांची पेन्शन योजना त्वरित बंद करून तो निधी कोनोना वैद्यकीय सेवेसाठी वापरण्यात यावा. महाराष्ट्रातील समाजकल्याण व आदिवासीकल्याण मंत्रालयात विविध योजनांची प्रभावी व संपूर्ण निधीचा सदुपयोग करून कोरोना महामारीत दलित-आदिवासी कुटुंबाना आर्थिक सक्षमता प्रदान केली पाहिजे. गोरगरीब पालकांच्या विध्यार्थ्यांना शालेय फी अभावी शाळेत त्रास होऊ नये त्याकरिता शिक्षण संस्थानी अशा विद्यार्थ्यांना फी सवलत देऊन पुरेसा वेळ दयावा, यासाठी राज्य सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने तसे आदेश काढावेत. इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA