भाजपने उमेदवार न दिल्याने ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक बिनविरोध

भाजपने उमेदवार न दिल्याने ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक बिनविरोधठाणे


ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा लोणे तर उपाध्यक्ष पदी सुभाष पवार यांची बिनविरोध निवड झाली. एन.के.टी कॉलेजच्या सभागृहात पीठासीन अधिकारी अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेच्या प्रथम सार्वत्रिक निवडणूकीनंतर सध्या कार्यरत असणाऱ्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा कालावधी १५ जुलै रोजी पूर्ण झाला. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत दोन्ही पदासाठी एक-एकच अर्ज प्राप्त झाल्याने दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिका-यांनी घोषित केले. नवनिर्वाचित अध्यक्ष सुषमा लोणे या कल्याण तालुक्यातील खडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडुन आल्या आहेत तर उपाध्यक्ष सुभाष पवार हे मुरबाड तालुक्यातील कुडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत.


पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या समवेत बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाआघाडी गठीत करण्यात आली. ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाच्या आजच्या निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन महाआघाडी गठीत केली.  या निवडणुकीत भाजपाने उमेदवार दिला नाही. एन.के.टी कॉलेजच्या सभागृहात पीठासीन अधिकारी अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) तथा सभा सचिव छायादेवी शिसोदे उपस्थित होत्या.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA