कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पालिकेकडे ठोस उपाययोजनाच नाही
ठाणे
अर्धांगवायूमुळे चालताही येऊ शकत नाही असा ७२ वर्षीय रुग्ण भालचंद्र गायकवाड ठाणे कोविड रुग्णालयातून ६ दिवसापासून बेपत्ता झाले. मात्र ठाणे महानगरपालिकेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केेले. अखेर ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या आक्रमक भूमिकेनंतर ठामपा प्रशासनाने पोलिसात आज ६ जुलै रोजी नोंदवली तक्रार नोंदवली. मात्र ठाणे महानगरपालिकेविरुद्ध नातेवाईकांची तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ करीत आहेत. केवळ दिखाऊ कारवाई दाखविण्यासाठी ग्लोबल हब इस्पितळावर कापूरबावडी पोलिसांनी 'पेशंट मिसिंग'ची तक्रार नोंदवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ठामपा प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे ठाण्यामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ चेतना दिक्षितांनी महापालिकेच्या नवीन ग्लोबल रुग्णालयातील रुग्ण बेपत्ता होण्याचा हा भयानक प्रकार उघडकीस आणला.
ठामपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे आणखीन एक कारनामे म्हणजे जर एखाद्या इमारतीत कोरोना पॉझिटिव पेशंट सापडला तर महापालिका कर्मचारी सदर ठिकाणी बॅनर लावतात व सदर ठिकाणी औषध फवारणी करतात पट्ट्या लावतात आणि सदर परिसर बंद करण्यात येतो. त्यानंतर कोणत्याही प्रकारची सुविधा इथल्या नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप होत आहे. महापालिका फक्त एक बॅनर लावून आपली जबाबदारी पूर्ण करते व लोकांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून देते एक तर लॉक़डाऊनमुळे आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची झाली आहे व त्यातच लोकांना लाईट बिल भरण्यासाठी mseb कडून वारंवार फोन आणि एसएमएस येत आहेत अशा परिस्थितीत लोकांनी कोणाकडे जायचे. असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता महापालिकेने सदर ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याची तपासणी केली पाहिजे. आठवड्यातून एकदा तरी संपूर्ण परिसरात लोकांची तपासणी केली पाहिजे तसेच त्यांना अन्नधान्याची गरज आहे अशा लोकांना त्याचा पुरवठा केला पाहिजे. काही वयस्कर लोक जे घरातून हालचाल सुद्धा करू शकत नाही अशा लोकांची यादी तयार केली पाहिजे व अशा लोकांना औषध-पाणी सिलेंडर सर्व सुविधा पुरवा्व्यात अशी मागणी करण्यात येत आहे. जे लोक भाड्याच्या घरात राहत आहेत त्या लोकांच्या देखील खूप समस्या झाली आहे त्यांना देखील सर्वेक्षण करून त्यांना महापालिकेच्या ताब्यात असलेले काही वेळेपर्यंत म्हणजे कोरोना काळ संपेपर्यंत त्यांना महापालिकेच्या घरांमध्ये शिफ्ट करावेत. जेणेकरून कोरोनाचा प्रसार वाढणार नाही व अशा हालाखीच्या परिस्थितीत घर मालकांकडून करण्यात येणारी पिळवणूक होणार नाही. अनेक घर मालक आहेत जे अशा कठीण परिस्थितीत देखील घर भाडे मागत आहेत, नाही दिले तर घर खाली करण्याच्या धमक्या देत आहेत. महापालिकेने सदर बाबीवर तातडीने लक्ष द्यावे. आणि ठाणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी वर्तकनगर येथील विजय कदम यांनी सोशल मिडियाद्वारे ठामपा आयुक्तांकडे केली आहे.
0 टिप्पण्या