Top Post Ad

मंजूर झालेल्या कर्जांचे लाभार्थ्यांना त्वरीत वाटप करण्यात यावे

मंजूर झालेल्या कर्जांचे लाभार्थ्यांना त्वरीत वाटप करण्यात यावे


अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे जिल्हाधिकारी याना विविध मागण्यांबाबत निवेदन


नाशिक


अनु.जातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळामार्फत एन.एस.एफ.डी.सी. अंतर्गत जिल्ह्य़ाधिकारी बैठकीत लाॅटरी पध्दतीने मंजूर झालेले कर्ज प्रकरणे लाभार्थ्यांना अद्याप वितरीत झालेले नाहीत. तसेच या कर्जपुरवठा करतांना लावलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात व त्वरीत कर्ज वाटप करण्यात यावे. तसेच सातपूर विश्वास नगर २२ युडायस नं.२७२०१६०२४१६  येथील इंग्लिश माध्यम शाळेतील शिक्षक सेवक व मदतनीस यांची दोन वर्षांपासून मानधन न मिळाल्याने त्याचेवर उपासमारीची वेळ आलेली असुन त्यांचे मानधन मनपा शिक्षण विभागाणे त्वरीत अदा करावेत, इत्यादी मागण्यांचे निवेदन अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र (राज्य) या सामाजिक संघटनेच्या वतिने नासिक जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.


नाशिक जिल्ह्य़ातील महिला बचत गटाला फायनान्स कंपनी मार्फत कर्ज वितरीत केले जाते. कोरोणा लाॅकडाऊन व संचारबंदी कालावधीत महिलांना रोजगार व कामधंदा नसल्याने त्या फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता व व्याज भरुन शकत नाहीत. शासन परिपत्रकानुसार लाॅकडाऊन संचारबंदी कालावधीतील महीन्यात बँकेकडून व फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या बचत गटाचे कर्ज हप्ते व व्याज माफ करण्यात यावे. हे महीने वगळुन हप्ते भरण्याची मुभा देण्यात यावी. अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 


समितीचे प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांचे नेतृत्वाखाली समितीचे युवक जिल्हाध्यक्ष आयु. विकास ऊर्फ पिंटुभाऊ वाघ (मनमाड), जिल्हाकार्याध्यक्षा उपासिका सौ.वैशालीताई मिलिंद जाधव, मनमाड शहर अध्यक्ष आयु.तुषार अशोक आहीरे, श्रामणेर व सामाजिक कार्यकर्ते आयु.मिलिंद जाधव, आयु.प्रविण महाले सर,  सौ.संगीता उशिरे, सौ. वंदना असीरे, आदी. पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी सदर निवेदनातील मजकुर संबंधित खात्याकडे उचीत कार्यवाही करीता पाठविण्यात येवुन संबंधितांना न्याय दिला जाईल असे आश्वासन शिष्टमंडाळाला दिले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com