"राजगृह" वर हल्ला करणार्या हल्लेखोरावर कठोर कारवाई करा.
जातीअंत संघर्ष समिति, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी
मुंबई
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील दादर येथील "राजगृह" निवासस्थानावर अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जातिअंत संघर्ष समिति आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मुंबई कमिटी तीव्र धिक्कार करीत आहे. हल्लेखोरांवर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
जागतीक मानवतावादी क्रांतिकारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या "राजगृह" निवासस्थानी केलेल्या हल्लाबाबतीत जातीअंत संघर्ष समिती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या शिष्टमंडळ यांनी भीमराव आंबेडकर यांची कम्युनिस्टनेते काॅम्रेड शैलेंद्र कांबळे,इंदूमिल राष्ट्रीय स्मारक प्रणेते चंद्रकांत भंडारे, वरिष्ठ पत्रकार दिपक पवार आदिनी भेट घेतली. जातीअंत संघर्ष समिति, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि डावी आघाडी आणि पुरोगामी पक्ष या प्रकरणात आपल्या सोबत असल्याचा विश्वास काॅम्रेड कांबळे यांनी यावेळी व्यक्त केला.
"राजगृह" निवासस्थानी विकृत मानसिकतेतून हल्ला करण्यात आला. हा हल्ला करण्यामागे एक गंभीर कटकारस्थन व षडयंत्र आहे. जातीय तेड निर्माण करणे, वर्गीय हीत जपत राजकीय, जातीय,वर्गीय फायदा काही मुठभर सत्ताधारी भांडवलदारी उठवत आहेत. तसेच जनतेमधील सामाजिक एकोपा आणि मैत्रीपूर्ण वातावरण नष्ट होऊन अराजकता निर्माण करण्याचे कटकारस्थन "राजगृह" झालेल्या हल्ल्यातुन दिसून येत. संविधान निर्माता डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या "राजगृह" हल्ला म्हणजे देशाच्या संसदेवर केलेला हल्ला आहे. या हल्लेखोरावर देशद्रोहचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सरकारकडे करण्याचा येत आहे. काॅम्रेड कांबळे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या