Top Post Ad

वीज बिलवाढ रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना रोज एक मेल व मेसेज करा- स्वराज इंडिया

वीज बिलवाढ रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना रोज एक मेल व मेसेज करा


स्वराज इंडिया महाराष्ट्रचे नागरिकांना आवाहन


ठाणे
करोना मुळे थाम्बविलेली वीज बिल नागरिकांना मिळायला लागली तसा सर्वाना एकच शॉक बसायला सुरवात झाली. प्रचंड वाढीव दराने आलेली बिले पाहून घाम फुटला. करोना मुळे रोजगार गेलेले, उत्पन्न नसलेले व असलेली शिल्लक कधीही संपेल या चिंतेत प्रचंड भर  घालणारी वीज बिले पाहून नागरिक हैराण झाले आहेत. वीज कंपन्यांची कार्यालये पोलीस संरक्षणात  गेली असून, सामान्य माणसाला कोणताही समाधानकारक खुलासा अधिकारी व कर्मचारी देत नाहीत. अधिकारी फक्त ‘वरून आदेश आहेत’ इतकेच सांगत आहेत. याबाबत ऊर्जा मंत्री श्री.नितीन राऊत यांनी केलेले खुलासेही असमाधानकारक आहेत. सध्या लॉक डाउन स्थितीत जनता रस्त्यावर येऊन आंदोलन करू शकणार नाही याची खात्री असल्याने शासन  व एमइआरसी (महाराष्ट्र वीज नियामक आयोग) मन मानेल तसे भाव वाढवत आहेत. या दरवाढीचा निषेध करतानाच एक अभिनव आंदोलन नागरिकांनी करावे असे आवाहन स्वराज इंडिया महाराष्ट्र चे अध्यक्ष ललित बाबर, सेक्रेटरी प्रत्युष, ओम प्रकाश कलमे, हिरामण पगार, सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, मानव कांबळे, इस्माईल समडोळे, वंदना शिंदे, शुभदा चव्हाण संजीव साने  यांनी केले आहे.


आंदोलनाचे स्वरूप
1) प्रत्येकाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अर्थ नियोजन मंत्री व ऊर्जा मंत्री यांना एक मेल करायचा व त्यात खालील मागण्या करायच्या. त्यांचे ईमेल आयडी मा उद्धव ठाकरे  cm@maharashtra.gov.in    (9004115472) व सी,सी मध्ये मा.वीज मंत्री  नितीन राऊत   dr.nitinraut09@gmail.com व min-energy@gov.in   (9422102434) व अर्थ मंत्री अजित पवार dcm@maharashtra.gov.in   (9850051222) यांना ठेवावे.  तसेच रोज त्यांना एक मेसेज करायचा. ही भाववाढ रद्द करे पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवावे. 


या मेल व एसेज मध्ये लिहाव्यात खाली आपले नाव व पत्ता व फोन नंबर हि लिहावा. सी.सी मध्ये swarajindiamh@gmail.com  ठेवावे
१) वीज दर वाढ जी 1 एप्रिल 2020 पासून केली आहे ती पूर्ण मागे घेऊन 1 जानेवारी 2021 पासून लागू करावी. ( मधल्या काळात ज्यांनी बिले भरली असतील त्यांची ही रक्कम एडव्हान्स म्हणून घेऊन नंतर ती एडजेस्ट करावी
२) एप्रिल  ते डिसेंबर 2020 या काळातील वीज बिल सरसकट माफ करावे.
असे लाखो वीज ग्राहकांनी नियमितपणे केले तरच शासनाच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडेल असे स्वराज इंडियास वाटते. हे गाऱ्हाणे सरकारपुढे घालावे असे आवाहन.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com