Top Post Ad

मेरा देश महान

अमेरिकेत  देव नाही ना मठ नाही पण पाऊस मात्र वेळेवर आहे व भरपूर आहे.गेल्या २०० वर्षात  दुष्काळ  नाही
कुठले होमहवन नाही ना कसली वारी नाही .कसले अभिषेक नाही ना अनुष्ठानं नाही. हरिनाम सप्ताह नाही ना पारायणे नाहीत
अमेरिकेत लोकसंख्या नियंत्रणात आहे. अन्नधान्य विपूल आहे. सुखसोयी विपूल आहेत कशाचीच कमतरता नाही.
माणशी 2876 वृक्ष आहेत. भारतात फक्त माणशी २८ झाडे आहेत  आपल्याकडे वृक्षवल्ली आम्हां सोयरे म्हणतो पण एकही भारतीय झाड लावत नाही. जपत नाही. अमेरिकेत घरासमोर हिरवळ नाही असं घर नाही.



भारतात दारात झाड नाही तर हिरवळ कुठली. स्वातंत्र्य  मिळून ७० वर्ष  झाली साधं पिण्याच पाणी देवू शकत नाही. अमेरिकेचे क्षेत्रफळ  भारता पेक्षा तिप्पट  आहे आणि लोकसंख्या  आहे 31 कोटी. भारताची आहे 135 कोटी  35 कोटीची 135 कोटी झाली फक्त 80 वर्षात. एवढीच जबरदस्त  प्रगती आहे. इथै हजारो जाती सतराशे साठ धर्म  कुणाचाच मेळ नाही प्रत्येकजण  म्हणतो आमचाच देव खरा, आमचाच धर्म  मोठा. नाही  आताच पिण्यास पाणी नाही तर पुढे काय कुणालाही पर्यावरणाची फिकर नाही. निसर्गाची चाड नाही.नुसतेच भरतात कुंभमेळे आणि जत्रा व यात्रा,जमात व धर्माचे मेळे होत आहेत प्रार्थना  केल्या जात आहे नुसतेच माजलेत धर्माचे स्तोम. एकाही धर्माच्या देवात पाऊस पाडण्याची ताकद नाही.  उससे बडा कोई नही"  ईश्वराशिवाय कुणी महान नाही  हे ऐकुण ऐकुण  58 वर्ष  झाली दरवर्षी  तेच. पाऊस नाही पडलाच तर पिकाला भाव नाही शेतकरी पाऊस पडला तरी आत्महत्या करतो  नाही पडला तरी आत्महत्या करतो

सगळंयाना आरक्षण पाहीजे  म्हणता  म्हणता आरक्षण 100%होण्याची  वेळ  आली. तरीही  काही मिळनार नाही


  वित्तमंत्री सितारामन यांनी परवाच संसदेत सांगीतले  देशातील 1 लाख 60 हजार कंपन्या बंद झाल्या सहाकोटी लोक बेरोजगार झाले. नोक-याच नाही तर आरक्षण घेवून काय चाटायचे.आता नोक-याच बंद होत आहेत आहे त्या नोकरांनाच पगार देण्याची ताकद सरकारमध्ये नाही. महाराष्ट्रात  कंत्राटी पद्धतीने नोकर भरती होणार आहे. डाॅक्टर इंजिनिअर ला 20.000 रूपये पगार ठरवला  आहे तर..... विचार करा पन्नास-पन्नास  लाख खर्च करून डाॅक्टर इंजिनिअर  झालेल्यांनी काय करावे


सबका विकास जावून भारत बनेगा भकास असं दिसत आहे. निवडणुकावरचा विश्वास  उडाला आहे. मॅचच फिक्स असेल तर खेळायचेच कशाला. जनता दिशाहीन झाली आहे स्वप्न राखेत मिसळली आहेत. संविधान नावांला उरले आहे.  चौकशी शिवाय अटक असा न्याय झाला आहे. प्रचंड महागाई ने जनता मरणप्राय झाली आहे तरी सरकार डिझेल पेट्रोल  वाढवतच आहे
दवाखाना कुटूंबाचे दिवाळं काढत आहे. जनतेला लुटण्यासाठी  लुबाडण्यासाठी सरकार सहीत असंख्य  गिधाडे सरसावली आहेत
 
  चिंता व ताणतणावाने अर्धा भारता मधुमेह ग्रस्त झाला आहे .30% लोकांना रक्तदाब आहे.
 शेतात काम करायला मजूर नाही अंगमेहनतीला माणुस नाही
सगळे  बिनकामाची माणसं आहेत. नवरा साहेब बायको मॅडम झाल्या आहेत😡😡😡😡😡😡🌹
 स्वयंपाकाला बाई भांडी व धुण्याला बाई. 
तरी यांची मॅडमची सतत पाठ व कंबर दुखते आहे.


आणि


 साहेबांना  टेकल्याशिवाय बसता येत नाही.


कुंभ मेळ्यात 10,000 सुशिक्षित  व उच्चशिक्षित  लोकांनी  साधूची दिक्षा घेतली.आणि आता बोबलंत रस्त्यावर  भटकत आहेत. विरक्त झाले आहेत लग्नाचे वय टळून गेले आहे. बायका मिळत नाहीत. गांवागावांत किमान चाळीस पन्नास  पोरं बिन लग्नाची आहेत.  भयंकर  विदारक परिस्थिती  आहे. एक मुलगा सांभाळ करने कठीण झाले तरी एकएकाला सतरा लेकरं कुत्र्यावाणी भटकत आहेत रस्त्यावर.  ना शिक्षण  ना संस्कार ना आचार ना शिस्त. सगळं  बिनधास्त  आणी मस्त. 


 बाजारात फळे बळेच पिकवून विकत आहेत. गावरान सगळं  सपलं आहे. मराठी शाळा बंद पडल्या आहेत मुलांना  धड इंग्रजी  येत नाही आणि मराठी येत नाही. मराठी इंग्लिश बोलत आहेत. टिव्ही  वरच्या मालिका नग्न झाल्या आहेत गुन्हेगारी जास्त  दाखवत आहे. मुलं लहानपणापासूनच  हिसंक होत आहेत. 13 व्या वर्षीच मुलंमुली पळून जात आहेत. दारू कितीही महाग केली तरी त्यासाठी रांगा लागत आहेत. प्रार्थना स्थळे लुटीची ठिकाणं झाली आहेत. वृद्धाआश्रमाची संख्या झपाट्याने  वाढत आहेत. तो एक मोठा व्यवसाय  होवू पहात आहे


आईला बाळासाठी वेळ  नाही. पाळणाघरे वाढत आहेत
लेकासुनांना सासुसासरे नकोत
अनाथालये वाढत आहेत. भारतिय संस्कृती चा पार बट्याबोळ झाला आहे
माणसं पदोपदी खोटं बोलत आहेत. खोटं बोलणच खरं मानलं जात आहे
चोरांना लबाडांना प्रतिष्ठा मिळत आहे. सज्जनांना वेड्यात काढत आहेत. लोकशाही समता बंधुता स्वातंत्र्य  हे फक्त वाट्सअपचे संदेशा पुर्ती  मर्यादित  झाली आहे. चांगले वागण्याचे करोडो मेसेज रोज फिरत आहेत. प्रत्येक जण चांगलं वागा म्हणत आहे.आज ही सुना राॅकेल टाकुन जाळल्या जात आहेत. साहित्यीक मारले जात आहेत. शिवरायांनी 350 वर्षापुर्वी  साहित्यकांना उत्तम लिखाणासाठी कोटी रूपया पर्यंत मानधन दिले होते आज. आज साहित्यीक हात पसरत आहेत. 
    
एकंदरीत भारत विस्फोटाचा व उद्रेकाचा  ज्वालामुखी बनत आहे. भारत मानवी वस्तीसाठी  धोकादायक  होत चालला आहे
वेळीच सावरलो नाहीत तर आपल्या वारसांचे जीवन प्रचंड संकटाच्या गराड्यात सापडनार आहे. हे नक्की


🔶लेखकाचे जाहीर आभार🔶


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com