ठाणे
ठाणे जिल्ह्यात मागील २४ तासांत जिल्ह्यात १२४.५६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. तर ठाणे शहर परिसरात संध्याकाळपर्यंत सर्वाधिक १२०.६८ मि.मी. पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे ठाणे आणि कळवा स्थानकातील रूळ पाण्याखाली गेल्याने आपत्कालीन सेवांसाठी सुरू असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली होती. दिवसभरात ठाणे शहरात १२ ठिकाणी पाणी साचले होते. सकाळी मानकोलीजवळ बस आणि कारचा अपघात झाल्याने मुंबई -नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती
मथुराबाई परदेशी चाळीजवळ, साई अनंद टॉवरसमोर, तेली गल्ली, धोबी आली, टेंभी नाका येथील इमारतीचा काही भाग कोसळला खेताळे बागेच्या मागील बाजूस, महिंद्रा डीएक्स कंपनीच्या पुढे, शिवकृपा नगर, रोड क्र .१,, पाइपलाइन जवळ, हजुरी येथील तसेच शिव दर्शन सोसायटी, चंदनवाडी, ठाणे (डब्ल्यू) समोर धोकादायक स्थितीत जांभूळकर चाळीमुळे खोल्याची भिंत पडल्याच्या घटना घडल्या,
गोकुळ नगर, माजिवडा सर्व्हिस रोड, जुन्या आरटीओ कार्यालयामागील उर्जित हॉटेल वंदना सिनेमासमोर, अशोक सिनेमाजवळ, स्टेशन रोड, दत्ता विजय सोसायटी जवळ, ठाणेकर वाडी, कोपरी, दिवा येथे विविध ठिकाणी. वागळे इस्टेट, पाचपाखाडी, जव्हारबाग मागे ढिगाऱ्यामुळे जि.प. क्वार्टरच्या आवारात. सिडको पुलाजवळील रस्त्यावर, चेंदणी बंडर रोड, कोपरी पोलीस ठाण्यामागील बंगला क्र ..3 च्या जवळ रस्त्यावर, बी केबिन, नौपाडा, खरेगाव, कळवा (प). मुंब्रा देवी रोड, प्रशांत नगर, दिवा (ई). मानपाडा, ठाणे (डब्ल्यू). लोकमान्य नगर, श्रीनगर, वागळे इस्टेट, बुद्ध विहारजवळ,आंबेडकर रोड, रुपादेवी मैदान, इंदिरा नगर, वागळे शेलार पाडा, कोलबाद, गीता सोसायटी जवळ, कळवा, मनीष नगर, कळवा, आदी अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना आपत्ती विभागाला प्राप्त झाल्या. मात्र लॉकडाऊनमुळे नागरिकांनी घरातच राहणे पसंत केल्याने घराबाहेरील जनजीवनावर या पावसाचा फारसा परिणाम जाणवला नाही..
0 टिप्पण्या