नवी मुंबईतील लेण्यांबाबत कायदेशीर मार्गाने तोडगा काढू - डॉ.सुरेश माने
नवी मुंबई
सिडको व नवीन विमानतळ प्राधिकरण यांनी नवी मुंबईतील केरूमाता लेणी म्हणजेच कोंबडभुंजे बौध्द लेणी उध्वस्त करण्याची बेकायदेशीर कारवाई सुरू केली आहे. ती ताबडतोब थांबविण्याचे आदेश राज्य सरकारने आपल्या अखत्यारीत सिडको व नवीन विमानतळ प्राधिकरण यांना तातडीने देण्याची आवश्यकता आहे. पुरातत्व विभाग महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकार यानी पुरावशेष संरक्षण कायदा, 1958 नुसार ही लेणी नष्ट न होऊ देता संरक्षित करण्याचा आदेश सिडको व विमानतळ प्राधिकरणाला दिला आहे. तरीही ती लेणी उध्वस्त करण्याची कारवाई सुरु झाली आहे. याबाबतचा आढावा घेण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुरेश माने यांनी आज २२ जुलै रोजी या परिसराला भेट दिली. अंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील बुद्धलेणी संदर्भात प्रत्यक्ष माहिती त्यांनी यावेळी घेतली.यावर कायदेशीर मार्गाने तोडगा काढू असे मत डॉ.माने सरांनी यावेळी व्यक्त केले. या लेणी बचाव आंदोलनाचे प्रमुख राजाराम माने आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
केरूमाता बौध्द लेणी ही पाचव्या शतकातील लेणी आहेत. ही लेणी कोंबडभुजे नावानेही प्रसिद्ध आहेत. बौध्द साहित्यात या जागेचा उल्लेख खारपुसे खारिवली अशा प्रकारे आला आहे. तसा उल्लेख सरकारी Gazzetes मध्ये आला आहे. ही लेणी गेल्या अनेक वर्षांपासून केरूमाता मंदिर या नावाने ओळखली जातात. आगरी कोळी भंडारी कराडी या ओबीसी जाती समूहांनी या लेण्यांना केरूमाता देवीचे मंदिर म्हणून पूजापाठ करीत आजपर्यंत जपले आहे. अन्यथा नैसर्गिक आपत्ती मुळे किंवा मानवी घडामोडींमुळे ही लेणी नष्ट होऊ शकली असती हे विसरून चालणार नाही. बौध्द धम्माच्या पडझडीच्या काळात असंख्य बौध्द भिक्खु व सामान्य बौध्द जनता यांची प्रचंड प्रमाणात हत्याकांडे करण्यात आली. त्यामुळे बुद्ध आणि त्यांचा धम्म यांची मूलभूत शिकवण यांचा प्रचार, प्रसार व आचरण करणारे कुणी शिल्लक राहिले नाही. याच काळात बौध्द धम्म व बौध्द संस्कृतीचे मोठ्या प्रमाणावर ब्राह्मणी करण करण्यात आले. बौध्द विहारांचे रूपांतर ब्राह्मणी मंदिरात करण्यात आले. बुद्धाच्या मुर्त्त्यांची तोडफोड केली गेली. अनेक ठिकाणी बुद्ध मुर्तीच्या ठिकाणी काल्पनिक देव देवता बसविल्या गेल्या आणि या विहारांमधून ब्राह्मणी पूजा अर्चा सुरू झाल्या.
0 टिप्पण्या