सायन येथील आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे घवघवीत यश
मुंबई
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या उन्हाळी २०१९ च्या परिक्षेच्या गुणवत्ता यादीत आयुर्विद्या प्रसारक मंडळ संचालित सायन येथील आयुर्वेद महाविद्यालयातील द्वितीय वर्ष बी.ए.एम.एस.ची विद्यार्थिनी कु. नीरजा अय्यर हिने संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वाधिक गुण मिळवून गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक व सुवर्णपदक प्राप्त केलेले आहे. तर द्वितीय वर्ष बी.ए.एम.एस. ची विद्यार्थिनी कु. सिद्धी कार्लेकर हिने गुणवत्ता यादीत संपूर्ण महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. तसेच तृतीय वर्ष बी.ए.एम.एस.ची विद्यार्थिनी कु.किर्ती गायकवाड हिला देखील गुणवत्ता यादीत संपूर्ण महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे.
आमच्या महाविद्यालयासाठी विशेष अभिमानास्पद व गौरवास्पद बाब म्हणजे सन २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकतर्फे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेत आमच्या महाविद्यालयातील द्वितीय वर्ष बी.ए.एम.एस. या वर्गातील अनुक्रमे कु. प्रतीक्षा ढगे , कु. किर्ती गायकवाड , कु. नीरजा अय्यर या विद्यार्थिनींना सातत्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक कडून सुवर्णपदक मिळालेले आहे. या सर्व यशस्वीतांचे आयुर्विद्या प्रसारक मंडळाचे सर्व विश्वस्त, महाविद्यालयाचे प्राचार्य वैद्य सूर्यभान डोंगरे, वैद्य. एस. एम. सातपुते, उपप्राचार्य वैद्य. अशोक दा. रामटेके, उपप्राचार्य वैद्य, रविदास मोरे, सर्व अध्यापक, रुग्णालय व महाविद्यालयाचे अध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनंदन केले.
0 टिप्पण्या