लॉकडाऊन कायम.... मग मदत कार्यही सुरूच - भीमराव चिलगावकर

बहुजन संग्रामचे कोरोना मदतकार्य १५ ऑगस्टपर्यंत चालणार -  भीमराव चिलगावकरमुंबई


कोन्टोनमेन्ट झोनच्या क्षेत्रात लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत कायम राहिल. या क्षेत्रात अधिकाधिक लोक सर्वसामान्य, मजूर, कामगार वर्गातील राहतात. चार महिन्याचा काळ उलटून गेला तरी त्यांना रोजच्या जेवणाची विवंचना सतावतच आहे. अशी परिस्थिती असतानाही अनेक संस्था संघटनांनी आपला मदतीचा हात अकडता घेतला आहे. मात्र गोरगरिबांना शिधा आणि किराणा वस्तूंच्या वाटपाचे सुरू असलेले मदतकार्य परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्धार बहुजन संग्रामने केला आहे. आजपर्यंत अनेक दानशूर दात्यांच्यामुळे हे कार्य करत आहोत. यापुढेही त्यांच्याच सहकार्याने ही मदत करण्यात येईल, असे मत बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष  भीमराव चिलगावकर यांनी "प्रजासत्ताक जनता"शी बोलतांना व्यक्त केले.


कोरोनाच्या या महामारीपेक्षा उपासमारीने गोरगरीब जनतेचे प्रचंड हाल होत आहे.म्हणून बहुजन संग्राम तर्फे गेल्या ४ महिन्यांपासून सुरू असलेल्या आणि १५ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या मानवतावादी मदत कार्यास दात्यांनी व सुस्थितीत असलेल्या नागरिकांनी सढळ हाताने व उदार अंत:करणाने जीवनावश्यक वस्तूरूपाने किंवा ऑनलाईन रोख रकमेद्वारे सहकार्य करून गोरगरीब समाजाला उपासमारीपासून  वाचवून त्यांना जीवदान देवून त्यांचा आपण दुवा घ्यावा असे कळकळीचे आवाहन भीमराव चिलगावकर यांनी केले आहे.


 २५ जुलै रोजी ठाणे शहर व ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण येथे ७०० गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून येत्या १५ ऑगस्टपर्यंत अजून ५ हजार हातावर पोट असलेल्या व्यक्तींना अन्नधान्याचे ३ टप्प्यात  महाराष्ट्रभर वाटप करून असे एकूण १० हजार गोरगरीब जनतेला किराणा देण्याचे ठरल्याप्रमाणे वाटप करून आम्ही आमचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत. असे बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेश सचिव ईजि.जी.डी.मेश्राम यांनी सांगितले.


२५ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यात बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांच्या हस्ते गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी पत्रकार सुबोध शाक्यरत्न, पत्रकार विलास शंभरकर, मोहसीन भाई ,विनोद कांबळे, तेजस वाघ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कोरोनाच्या या जागतीक संकटकाळात लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्याने गेल्या 4 महिन्यांत जून अखेरपर्यंत सुमारे ५ हजार गरजुंना टप्प्याटप्प्याने मुंबई उपनगर, पालघरच्या आदिवासी बहूल जिल्ह्यात बहुजन संग्राम या महाराष्ट्रव्यापक सामाजीक, विधायक, सेवाभावी, संघटनेने प्रत्येक व्यक्तीस १ हजार रुपयांचा शिधा, किराणा दिला असल्याची माहिती बहुजन संग्रामचे संघटक सचिव विनोद कांबळे यांनी दिली आहे.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA