एमएमआर रिजनमध्ये मध्ये रुग्णांच्या केसेस वाढत असल्यामुळे टेस्टिंग रेट वाढविणे गरजेचे! - देवेंद्र फडणवीस
कल्याण
एम.एम.आर रिजनमध्ये मध्ये रुग्णांच्या केसेस वाढत असल्यामुळे टेस्टिंग रेट वाढविणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले, ५ जुलै रोजी कल्याणमधील हॉलीक्रॉस कोविड रुग्णालयाला भेट देतेवेळी त्यांनी आपले विचार मांडले. सध्याची स्थिती क्रिटीकल असून त्यासाठी आपली पूर्ण क्षमता राबवावी लागेल, जसे टेस्टिंग वाढेल तसे रुग्णांसाठी इन्फ्रास्ट्रक्चरही असणे आवश्यक आहे, एम.एम.आर रिजनमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण हा दौरा केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हॉलीक्रॉस रुग्णालयाने चांगल्या प्रकारे काम केले असून "कोविड योध्यांना माझा सलाम" अशा शब्दात त्यांनी हॉलीक्रॉसच्या कर्मचारी वर्गाची प्रशंसा केली.
प्रविण दरेकर, रविंद्र चव्हाण, आमदार, गणपत गायकवाड, आमदार, निरंजन डावखरे, आमदार, नरेंद्र पवार, माजी आमदार, सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त, नितीन महाजन, प्रांत अधिकारी तसेच महापालिका अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता. हॉलीक्रॉस रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून दिनांक १९ एप्रिल 2020 ला सुरु केले त्यामध्ये आतापर्यंत 313 रुग्ण दाखल केले असून केवळ 15 मृत्यू झाले आहेत आणि एक १९ दिवसाचे बाळ देखील या आजारातून बरे झालेले आहे अशी माहिती आय. एम. ए चे सेक्रेटरी डॉ.प्रशांत पाटील यांनी या वेळी दिली.
महापालिकेत पहिला रुग्ण दिनांक 13 मार्च, 2020 सापडला तद्नंतर लगेचच महापालिकेने दिनांक 16 मार्च, 2020 ला इंडियन मेडीकल असोसिएशनसोबत बैठक घेतली व त्वरीत निऑन, बाज आर.आर रुग्णालय व हॉलीक्रॉस रुग्णालय यांचेसमवेत सामजंस्य करार केला, आता महापालिकेने 17 खाजगी रुग्णालयासोबत सामजंस्य करार केला आहे. उद्या मनपाच्या सावळाराम क्रीडा संकूलातील बंदिस्त बॅडमिंटन कोर्ट येथील 30 बेडचे आय.सी.यु व 155 बेडचे ऑक्सिजन सुविधा सुरु होत असून डोंबिवलीतील जिमखाना येथे 70 बेडचे आय.सी.यु. व 30 बेडचे ऑक्सिजन सुविधा तसेच बीओटी तत्वावरील आर्ट गॅलरीमध्ये 120 बेडस आय.सी.यु व 250 बेडचे ऑक्सिजन सुविधा 15 जुलै, 2020 कार्यान्वित होणार आहे. आता सुमारे 800 टेस्ट प्रतिदिन होत असून त्या 2000 प्रतिदिन करण्याची अपेक्षा आहे त्यासाठी महापालिकेच्या वार्डवॉईज क्वांरन्टाईन सेंटर उभारण्याची तयारी आम्ही करीत आहोत साधरणत: दिनांक 15 जुलैपर्यंत सुविधा तयार होतील. अशी माहिती पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.
0 टिप्पण्या